Join us

Mouni Roy Wedding : हा आहे मौनी रॉयचा ‘सब कुछ’, लग्नाआधी  शेअर केला रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:04 AM

Mouni Roy Wedding : टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय आज 27 जानेवारी लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाआधी मौनीने तिच्या होणाऱ्या पतीदेवांसोबतचा फोटो शेअर केला आहे.

टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आज 27 जानेवारी लग्नबंधनात अडकणार आहे. गोव्यात या लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. मौनीच्या हळदीचे आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान लग्नाआधी मौनीने तिच्या होणाऱ्या पतीदेवांसोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोत मौनी व सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे.फोटोत मौनीने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे तर सूरजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.  सूरजला मिठीत घेत मौनी त्याच्याकडे हसऱ्या नजरेत बघते आहे. ‘सब कुछ... हरी ओम... ओम नम: शिवाय...,’ असं कॅप्शन देत मौनीने हा फोटो शेअर केला आहे.

तिच्या या पोस्टवर आशका गोरडिया, दृष्टि धामी, आमिर अली, मंदिरा बेदी, श्रद्धा आर्या, अर्जुन बिजलानी, जेनिफर विंगेट आदींनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

गोव्यात अनेक दिवसांपासून मौनीच्या लग्नाची तयारी सुरू होती. मौनीच्या लग्नात तिचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय तेवढेच सामील होणार आहेत.मौनीचा ‘सब कुछ’ सूरज हा दुबईत राहतो. बिझनेसमॅन आणि बँक इव्हेस्टर अशी त्याची ओळख आहे. सूरज हा मूळचा बेंगळुरूचा. जैन कुटुंबात जन्मलेल्या सूरजने आर.व्ही.अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बी.टेक केले आहे. तसेच, स्टॅनफोर्ड विद्यापीठात गुंतवणूक, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाचा पदविका अभ्यास केला आहे. 

सूरजने अशोक इंडिया या कंपनीत इंटर्न म्हणून काम केले होते. सध्या तो इन्व्हिक्टस म्हणून एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग अँड बिजनेस डेव्हलपमेंट कंपनीत कार्यरत आहे. तो, असोसिएशन ऑफ चार्टर्ड अल्टरनेटिव इन्व्हेस्टमेंट अ‍ॅनालिस्टचा सदस्य असून, युएईमधील कॅपिटल मार्केटचा डायरेक्टर हेड आहे. सूरजला ट्रॅव्हलिंग आणि बाईक रायडिंगची आवड आहे. त्याचं इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर हे लक्षात येतं. 

आता सूरज व मौनीची ओळख कशी झाली तर दुबईत. लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज एकमेकांना प्रथमच भेटले. लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईत अडकली होती. या दिवसांत ती तिच्या बहिणीच्या घरी होती. बहिणीच्या माध्यमातून तिची सूरजसोबत ओळख झाली आणि यानंतर मौनी आणि सूरजची जवळीक वाढली.

टॅग्स :मौनी राॅय