Join us

भावा-बहिणींच्या फोटोंचा नजराणा...!

By admin | Published: June 05, 2017 2:24 AM

भाऊ-बहीण हे रक्ताचं नातं अतिशय पवित्र असतं.

- Aboli Kulkarniभाऊ-बहीण हे रक्ताचं नातं अतिशय पवित्र असतं. जिवाला जीव देणारं आणि मदतीला आयुष्यभर धावून येणारं एकमेव नातं म्हणून भावा-बहिणीच्या रेशमी नात्याकडे पाहिले जाते. कधी भांडत तर कधी प्रेमानं हे नातं बालपणीचा प्रवास करत असतं. बालपणीचे दिवस हे आयुष्यात नेहमी स्मरणात राहणारे असतात. हे दिवस सुगंधित अत्तराप्रमाणे भुर्रकन उडून जातात. पण, स्मरणात कायम राहतात त्या या बालपणीच्या आठवणी. काळ सरला की, आपण या आठवणींना अल्बममधील फोटोंच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतो. असाच काहीसा प्रयत्न आपले लाडके सेलेब्रिटीदेखील करत असतात. खास तुमच्यासाठी या भावा-बहिणींच्या फोटोंचा हा खास नजराणा....रणबीर कपूर आणि रिधीमा कपूर ‘चॉकलेट बॉय’ रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिधीम कपूर यांच्यातील भावा-बहिणीचे नाते हे अत्यंत वेगळे आहे. रिधीमा कधीच बॉलिवूडच्या झगमगाटात आली नाही. ती एक ज्वेलरी डिझायनर आहे. रणबीर अनेकदा रिधीमा आणि त्याच्या भाचीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्या तिघांमधील बाँण्डिग ही खरंच खूप सुंदर आहे.रणवीर सिंग आणि रितीका भवानीरितीका भवानी ही रणवीर सिंगची मोठी बहीण आहे. तो तिच्या खूप जास्त क्लोज आहे. रणवीर त्याच्या यशामध्ये त्याच्या बहिणीचा खूप मोठा वाटा आहे, असे मानतो. रक्षाबंधनाच्या दिवशी तर तिने राखी बांधली की तो तिच्या पाया पडतो. असे हे भाऊ-बहीण एकत्र फारच क्यूट दिसतात. दीपिका पदुकोण आणि अनिषा पदुकोणदीपिका ही बॉलिवूडची दिवा आहे. अनिषा ही दीपिकाची खूप मोठी क्रिटिक आहे. दीपिकाच्या भूमिकांमधील चुका सर्वप्रथम तिची बहीणच दाखवून देते. ती एक चांगली बहीण तर आहेच पण त्याहीपेक्षा तिची एक खूप मोठी फॅनदेखील आहे.अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चनश्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन यांची खूप लाडकी लेक़ मात्र, त्यांनी कधीही अभिषेक आणि श्वेता यांच्यात दुजाभाव केला नाही. हे दोघे नेहमीच एकमेकांचे समर्थक आणि चांगले मित्र असतात. अनेक सोहळ्यांना अभिषेक आणि श्वेता यांनी एकमेकांसोबत एन्ट्री केली आहे.कॅटरिना कैफ आणि इसाबेल कैफ‘बॉलिवूडची बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ ही तिची बहीण इसाबेल क ैफ हिची फार जवळची बहीण आहे. या दोघी बहीण असण्यासोबतच चांगल्या मैत्रिणी आहेत. कॅ टरिना ही अनेक वेळा तिची बहीण इसाबेल कैफला तिच्यासोबत घेऊन येते. मध्यंतरी तिने इसाबेलच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीसाठीही प्रयत्न केले होते. आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट भट्ट कुटुंबीय हे बॉलिवूडमधील सर्वांत कूल कु टुंबांपैकी एक समजले जाते. त्यात आलिया आणि शाहीन या दोघी बहिणी एकमेकांसोबत मैत्रिणींप्रमाणेच राहतात. अशातच आलियाने एक घर घेतले असून त्या दोघी स्वतंत्र तिथेच राहतात. आलियाने खास त्या दोघींच्या आवडीनिवडीनुसार ते घर डिझाईन करून घेतले आहे.