प्रसिद्ध कोरियन म्युझिक बँड बीटीएस (BTS) सध्याच्या काळात तरुणाईसाठी नवीन नाही. या बँडची आणि त्यातील कलाकारांची तरुणींमध्ये कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे जगभरात बीटीएसचे चाहते पाहायला मिळतात. मात्र, या बँडमधील सर्वाधिक लोकप्रिय तरुण सदस्य असणाऱ्या जंगकूकने (Jungkook) इन्स्टाग्रामवरुन काढता पाय घेतला आहे. मात्र, Weverse या कम्युनिटी फोरमच्या माध्यमातून त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यामागचं कारणदेखील स्पष्ट केलं आहे.
"मी इन्स्टाग्राम वापरणं बंद केलं आहे. ते कोणीही हॅक केलेलं नाही. मी इन्स्टाग्रामचा वापर करत नव्हतो. त्यामुळे ते डिलीट करायचा निर्णय घेतला. म्हणून कोणीही काळजी करु नका", अशी पोस्ट जंगकूकने शेअर केली आहे.
दरम्यान, जंगकूकने इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याची माहिती दिल्यानंतर एका चाहत्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. जेके खरोखरच इन्स्टाग्राम वापरत नसेल. पण मला Weverse चे त्याचं लाईव्ह पाहायला आवडतं. त्यामुळे मला त्याच्याशी जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
BTS विषयी हे माहीत आहे का?
BTS हा एक दक्षिण कोरियाई (Republic of Korea) म्युझिकल बॉय बँड ग्रुप आहे. हा बँड Kpop Boy Band या नावानेही ओळखला जातो . या बँडमध्ये सात सदस्य असून त्यांची खासकरुन तरुणींमध्ये कमालीची क्रेझ आहे. किम सोकजिन (Jin Aka Kim Seok-Jin), मिन युंगी (Suga Aka Min Yoongi), जंग होसोक (J Hope Aka Jung Ho-seok), किम नामजून (RM Aka Kim Nam-Joon), पार्क जीमिन (Jimin Aka Park Jimin), किम तेह्युंग (V - Kim Tae-Hyung), आणि जीओन जंगकूक (Jungkook Aka Jeon Jung-kook) हे सात सदस्य या बँडमध्ये आहेत.