राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.नावाप्रमाणेच चित्रपटाची कथाही अतिशय रंजक आहे. चित्रपट 'बंटी और बबली २'मध्ये शाही संघर्ष पाहायला मिळणार आहे, जेथे सैफ अली खान आणि राणी मुखर्जीने साकारलेली भूमिका ओजी कॉन-कपल बंटी बबली सिद्धांत चतुर्वेदी आणि चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असलेली शर्वरी यांनी साकारलेली भूमिका नवीन कॉन-कपलसोबत टक्कर देताना पाहायला मिळणार आहे.
हसवून-हसवून लोटपोट करणारा हा विनोदी व कौटुंबिक सिनेमा आहे, ज्यामध्ये विभिन्न पिढ्यांमधील कॉन-स्टार्स एकमेकांशी संघर्ष करताना पाहायला मिळेल. तसेच ते एकमेकांवर मात करण्यासाठी आणि चतुर धूर्तबाज व्यक्ती असल्याचे सिद्ध करण्यासाठी वेषांतरामधील त्यांची कौशल्ये दाखवतात.
सैफ म्हणाला, ''फसवणूकीवर आधारित चित्रपटांमध्ये अनेक वेषांतरे पाहायला मिळतात आणि हीच बाब खूप मजेशीर असते. आजच्या युगात आपल्याकडे पूर्णत: गेटअप बदलण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोस्थेटिक्स मेकअप आहेत. ज्यामुळे प्रेक्षक कलाकारांकडून अभूतपूर्व पेहराव व वेषांतरांची अपेक्षा करू शकतात आणि हे वेषांतर करताना खूप मजा आली.''
राणी म्हणाली, ''धूर्तबाज व्यक्तींच्या दोन्ही जोड्या खूपच चतुर आहेत. या चित्रपटामध्ये या जोड्या एकमेकांचा सामना करतात आणि हा संघर्ष पाहावा असाच आहे.''सिद्धांत म्हणाला, ''मी एकाच चित्रपटामध्ये अनेक अवतार साकारले आहेत. 'बंटी और बबली' सारखा चित्रपट करताना तुम्ही प्रेक्षकांना खात्री देता की त्यांना प्रमुख कलाकार वेषांतर करून विलक्षण फसवणूक सादर करण्याचे मनोरंजन देणार आणि हा चित्रपट हेच मनोरंजन देईल.''
शर्वरी म्हणाली, ''चित्रपट 'बंटी और बबली २'मध्ये संधी मिळणंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. अनेक भूमिका साकारायला मिळतील असे प्रोजेक्ट सहजासहजी मिळत नाहीत. मी प्रत्येक भूमिका सराईतपणे साकारण्याचे ठरवले, कारण प्रेक्षकांना वेषांतराशी संलग्न करण्याची गरज आहे, ज्यामुळे ते धूर्तबाज व्यक्तीचा मनसोक्तपणे आनंद घेऊ शकतील. मी पूर्णत: शिफ्टर सारख्या या लुक्स/अवतारांमध्ये सामावून जाण्याचा खूप आनंद घेतला आणि माझे सर्वोत्तम कौशल्य सादर केले.'''बंटी और बबली २' चित्रपट जगभरात १९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.'बंटी और बबली २'चे दिग्दर्शन वरूण व्ही. शर्मा यांनी केले आहे, ज्यांनी वायआरएफचे सर्वात मोठे ब्लॉकबस्टर्स 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.