Join us

बंटी और बबली 2: घरातील 'या' व्यक्तीसाठी शर्वरी आहे 'नटी'; याच नावाने मारतात हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 6:21 PM

Bunty Aur Babli 2: 'बंटी और बबली' या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल 'बंटी और बबली २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बंटी और बबली या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाचा सीक्वेल बंटी और बबली २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण या सीक्वेलमध्ये अभिषेक बच्चन -राणी मुखर्जी नाही तर एक नवी जोडी बंटी आणि बबलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गली बॉय’चा स्टार सिद्धांत चतुर्वेदी या सिनेमात बंटीची भूमिका तर बबलीच्या भूमिकेत शर्वरी वाघ पहायला मिळणार आहे. 

बंटी और बबली २ या चित्रपटाबद्दल शर्वरी म्हणाली की, ट्रेलरमध्ये पाहिलच असेल सर्वांनी की आम्ही नवीन बंटी आणि बबली आहोत. ते नाव वापरून आम्ही लोकांना उल्लू बनवत आहोत. त्यामुळे ते बंटी आणि बबली त्यांच्यासोबत पोलीस आमच्या मागे हात धुवून लागले आहेत. नेमके आम्ही काय काय केले, त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

...त्यावेळी मी होते ८ वर्षांची

शर्वरी पुढे म्हणाली की, जेव्हा बंटी और बबली हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा ​मी ८ वर्षांची होती. माझ्या आईला राणी मॅमचे कपडे खूप आवडले होते. ते कॉलर कुर्ते, झोला असे सर्व त्यांच्यासारखे टेलरकडून बनवून घेतले होते.  तर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला की,  मी अकरा वर्षांचा होतो जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला होता मी माझ्या कुटुंबासोबत पाहिला होता. त्यातील सर्व गाणी खूप चांगली होती. ते आमच्या कॉलनीतील गणपती उत्सवात मी त्या गाण्यावर नाचलो आहे. त्यामुळे आता त्याच चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायला मिळते आहे. हे खूप मजेशीर ठरणार आहे.  

शर्वरी म्हणते, ...माझा विश्वासच बसत नव्हताबंटी और बबली २साठी शर्वरीने यशराजसाठी ऑडिशन दिले होते. तिला कोणत्या चित्रपटासाठी ऑडिशन देते आहे हेदेखील माहित नव्हते. दिग्दर्शक वरूण शर्मा आणि कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मा यांनी जेव्हा तिला सिलेक्शन झाले हे सांगितले त्यावेळी तिचा विश्वासच बसला नव्हता, असे शर्वरी सांगते. ती पुढे म्हणाली की, त्यानंतर माझी आदित्य चोप्रा यांच्यासोबत भेट झाली. तेव्हा मला स्क्रीप्ट मिळाली ही खूप मोठी जर्नी होती.

स्क्रीप्ट खूप मजेशीर वाटली - सिद्धांत चतुर्वेदीतर सिद्धांतने त्याची चित्रपटात निवड कशी झाली, याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, गलीबॉयनंतर मला शानू मॅमचा कॉल आला. या चित्रपटात काम करणार का विचारले. मी हो म्हटले. तू इंटेस कॅरेक्टर करतो यात  थोडी कॉमेडी आहे, असे शानू मॅम म्हणाल्या त्यावर मी म्हटले की एकदा दिग्दर्शकांसोबत भेट करून द्या. त्यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतर मी वरूण सरांना भेटलो आणि त्यांनी  मला स्क्रीप्ट ऐकवली. मला खूपच मजेशीर वाटली.  त्यामुळेच मी काम करायला होकार दिला.

शर्वरी आहे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात

शर्वरी ही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांची मुलगी आहे. या मुलाखतीत शर्वरीने सांगितले की, माझे आबा म्हणजेच आजोबा बंटी और बबली २ च्या रिलीजची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ती पुढे म्हणाली की, आम्ही सर्व नातवंडे त्यांना आबा अशी हाक मारतो. त्यांनी मला सांगितले होते की, तुला जे मनापासून करायचे आहे ते तू कर. कारण मनातून जे येते. त्याच्यावर जर तुम्ही मेहनत घेतली तर ते नक्कीच घडून येते. तसे त्यांनीदेखील काहीच राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात जाऊन त्यांचे नाव कमाविले. मी हे क्षेत्र निवडल्यामुळे ते खूप खूष आहेत. त्यांनी बंटी और बबली २चा ट्रेलर पाहिला. त्यांना खूप आवडला. मला ते नटी या नावाने हाक मारतात. 

टॅग्स :सिद्धांत चतुर्वेदीराणी मुखर्जीसैफ अली खान