सैफ अली खान (Saif Ali Khan ), राणी मुखर्जी, शर्वरी वाघ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘बंटी और बबली 2’ (Bunty Aur Babli 2) हा सिनेमा आज शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. याआधी 2005 मध्ये ‘बंटी और बबली’ आला होता आणि तुफान गाजला होता. या पहिल्या पार्टमध्ये राणी मुखर्जी (Rani Mukerji) व अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) लीड रोलमध्ये होते आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. ‘बंटी और बबली 2’मध्येही अभिषेक व राणी हीच जोडी दिसणार असा सर्वांचा अंदाज होता. पण यावेळी अभिषेकला सैफ अली खानने रिप्लेस केलं. राणीसोबत सैफची जोडी जमली. असं का? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात असावा, तर आताश: त्याचाही खुलासा झालायं.
‘बॉलिवूड लाईफ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बंटी और बबली 2’मध्ये टीमची पहिली पसंत अभिषेक बच्चन हाच होता. अभिषेकच बंटी साकारावा, अशी टीमची इच्छा होती. यासाठी अभिषेकला विचारणाही झाली होती. पण अभिषेक नेमका आपल्या अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी होता. ‘बंटी और बबली 2’ला आधीच उशीर झाला होता. पहिल्या पार्टनंतर अनेक वर्षांनी दुसरा पार्ट येणार होता. अशात मेकर्स आणखी विलंब करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी या सीक्वलसाठी सैफ अली खानशी संपर्क साधला. सैफ व राणी यांनी याआधीही एकत्र काम केलं होतं. त्यांची केमिस्टीही लोकांना आवडली होती. त्यामुळे ‘बंटी और बबली 2’साठी सैफच्या नावाचा विचार करण्यात आला. सैफने ‘बंटी और बबली 2’ची कथा ऐकली आणि त्याने लगेच होकार कळवला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बंटी और बबली 2’त नव्या बदलाने काहीशी निराश व घाबरलेली होती. पण पहिल्या दिवशी सेटवर सैफ अली खान दिसला आणि हा नवा बंटी पाहून तिची भीती कुठल्या कुठे पळाली. सैफ ‘बटी’च्या भूमिकेला योग्य न्याय देईल, याची खात्री राणीला पटली आणि ती बिनधस्त झाली. यापूर्वी राणी व सैफच्या जोडीने ‘हम तुम’मध्ये कमाल केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.