पॅरीसमध्ये सुरु असलेल्या कान्स फिल्म फेस्टिवल 2019 साठी बॉलिवूड ललना सज्ज आहेत. बॉलिवूड क्वीन कंगना राणौत ही सुद्धा या ललनांचा टक्कर देताना दिसली. कान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर अनेकींनी एकापेक्षा एक ग्लॅरस वेस्टर्न आऊटफिटसमध्ये एन्ट्री घेतली असताना कंगनाने मात्र या खास इंटरनॅशनल इव्हेंटसाठी इंडियन लूकची निवड केली.
अर्थात आपल्या या लूकला वेस्टर्न टच देणे ती विसरली नाही. यासाठी तिने पर्पल कलरचे ग्लव्स कॅरी केलेत. या गोल्डन कांजीवरम साडीसोबत कंगनाची स्टाईलिश हेअर स्टाईलही खास होती. केवळ इतकेच नाही तर यासोबत कंगनाने काळा चष्माही कॅरी केला होता.
लोकांना या इंटरनॅशनल इव्हेंटमधील कंगनाचा लूक इतका आवडला की, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या या लूकची प्रशंसा केली. एकंदर काय तर बॉलिवूडच्या या क्वीनने आपल्या रॉयल लूकने अनेकांची मने जिंकली.कंगना सध्या मेंटल है क्या आणि पंगा या दोन चित्रपटांत बिझी आहे. याशिवाय जलललितांच्या बायोपिकमध्येही ती दिसणार आहे.