सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा का म्हटले जाते, याचे उत्तर कान्स फिल्म फेस्टिवलमधील तिचे लूक पाहून मिळते. अगदी पहिल्याच दिवसांपासून सोनमचे कान्समधील लूक चर्चेचा विषय बनले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तिने कान्समध्ये आपली छाप सोडली. इतरांपेक्षा हटके लूकमध्ये ती कान्स रेड कार्पेटवर उतरली.डिझाईनर Ralph आणि Russo ने डिझाईन केलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये सोनम रेड कार्पेटवर उतरली आणि तिच्या या ग्लॅमरस लूकने सगळ्यांना इम्प्रेस केले. रेड कार्पेट वॉकसाठी सोनमने व्हाईट डिप प्लंगिंग लाईन टक्सीडो सूट निवडला.
कान्समध्ये Quentin Tarantino's Once Upon A Time in Hollywood च्या प्रीमीअरदरम्यान ती या बोल्ड व्हाईट लूकमध्ये दिसली. व्हाईट ब्लेजरला अटॅच असलेले लॉन्ग विंग्स, स्ट्रेट पँट,बेल्ट असा तिचा लूक होता. या व्हाईट ड्रेससोबत ग्रीन मल्टी लेअर नेकलेस आणि ईअररिंग्स सोनमच्या सौंदर्यात भर घातल होते.
या आऊटफिटसोबत स्लीक बन, स्मोकी मेकअप आणि न्यूड लिपस्टिकमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसली. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, पण सोनमचा हा रेड कार्पेट लूक तिची बहीण आणि स्टाईलिस्ट रिया कपूरने फायनल केला होता. सोनम कपूरचा हा लूक सोशल मीडियावरही हिट झाला.
कान्समधील तिचा आणखी एक लूकही घायाळ करणारा ठरला. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिच्या अदांनी सगळ्यांनाच खल्लास केले. सोनम कपूर फॅशनच्या बाबतीत परफेक्ट आहे. कुठला ड्रेस कसा कॅरी करायला, हे तिला ठाऊक आहे. या यॅलो रंगाच्या ड्रेसमधील सोनम म्हणूनच सगळ्यांना भावली.सोनमने फिल्म इंडस्ट्रीत ११ वर्षे पूर्ण केली आहेत. करिअरच्या सुरुवातीला तिने कान्समध्ये डेब्यू केला होता. तेव्हापासून दरवर्षी सोनम कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भाग घेत आलीय. हे तिचे दहावे वर्ष आहे.