Join us

रिलीजच्या काही तास आधी ‘संजू’मधून गाळला गेला ‘हा’सीन! वाचा, काय आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 3:06 PM

 राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं. 

ठळक मुद्दे ‘संजू’च्या ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारा हा सीन दिसला होता. पण आता तो चित्रपटात नसेल.

 राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं.  खरे तर ‘संजू’ हा राजकुमार हिराणी यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक प्रोजेक्ट आहे. अभिनेता संजय दत्तच्या वादग्रस्त आयुष्यावर चित्रपट काढण्याची त्यांची कधीचीचं इच्छा होती. उद्या त्यांची ही इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. होय, उद्या शुक्रवारी ‘संजू’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होतोय. पण ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर या चित्रपटातील एका सीनवर हिराणींना कात्री चालवावी लागलीय. हा सीन कुठला तर, संजय दत्तच्या बराकीतील टॉयलेट ओव्हरफ्लो होण्याचा. 

 संजयची व्यक्तिरेखा साकारणारा रणबीर कपूर बराकीत झोपला असताना अचानक त्याच्या बराकीतील टॉयलेट ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आणि हे पाहून रणबीर जोरजोरात ओरडू लागतो, असा हा सीन होता. ‘संजू’च्या ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारा हा सीन दिसला होता. पण आता तो चित्रपटात नसेल. याचे कारण म्हणजे, यासंदर्भात सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करण्यात आली होती. पृथ्वी नामक एका सामाजिक कार्यकर्त्याने या सीनवर आक्षेप नोंदवला होता. हे दृश्य भारतातील तुरुंग प्रशासनाची प्रतिमा मलीन करणारे आहे. कारण बराकीतील शौचालय ओव्हरफ्लो होण्याचे आजपर्यंत कुठेही ऐकिवात नाही, असा त्यांचा आक्षेप होता. अखेर सेन्सॉर बोर्डाने हा सीन गाळण्याचा निर्णय घेतला. सेन्सॉर बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरोची अगतिकता दाखविण्यापलीकडे या सीनमधून अधिक काहीही स्पष्ट होत नाही. कलात्मक अंगाने बघितल्यास हे ठीक नव्हते. चित्रपटाचे निर्मातेही सेन्सॉरच्या या मताशी सहमत झालेत आणि हा सीन गाळण्यात आला.काही दिवसांपूर्वी राजकुमार हिराणी या सीनबदद्ल बोलले होते. आम्ही हा सीन तुरुंगात चित्रीत केला होता. १९९३ च्या पावसाळ्यात असे झाले होते. एकदिवस खूप पाऊस आल्यामुळे संजयची बराक ओव्हरफ्लो झाली होती, असे ते म्हणाले होते.‘संजू’मध्ये रणबीर कपूरशिवाय परेश रावल,मनीषा कोईराला, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, दीया मिर्झा, विकी कौशल आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

 

टॅग्स :संजू चित्रपट 2018रणबीर कपूरराजकुमार हिरानीबॉलिवूडसंजय दत्तअनुष्का शर्मा