Join us

सेलिब्रिटींची सामाजिक संदेशाची होळी

By admin | Published: March 23, 2016 1:54 AM

बॉलीवूडमध्ये होळी हा सण म्हणजे एक मोठा उत्साहच असतो. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी पूर्णपणे व्हाईट कलरचे कपडे परिधान करून एकदम झक्कास स्टाईलने होळीचा आनंद लुटतात

बॉलीवूडमध्ये होळी हा सण म्हणजे एक मोठा उत्साहच असतो. सर्व बॉलिवूड सेलिब्रेटी पूर्णपणे व्हाईट कलरचे कपडे परिधान करून एकदम झक्कास स्टाईलने होळीचा आनंद लुटतात. पूर्वी राज कपूर यांच्या वेळेस आरके स्टुडिओमध्ये साजरी होणारी होळी ही बॉलिवूड इंडस्ट्रीसहित तमाम प्रेक्षकवर्गाला आकर्षित करणारी होती. त्याहीपलीकडे जाऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये होळी सेलिब्रेट करण्याची पद्धत तितकी रूढ नाही दिसत. यंदा ही मराठी सेलिब्रेटीमध्ये होळी साजरी करण्याची क्रेझ दिसत नाही. याउलट जाऊन मराठी तारकांनी लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून तरुणांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून सामाजिक संदेशाची होळी साजरी केली आहे.स्वप्निल खेळणार नाही रंगांची होळीहोळी, धुलिवंदन या सणांना रंगांची उधळण करून तरुणाई भरमसाट पाण्याचा अपव्यय दरवर्षीच करीत असते. परंतु आताची परिस्थिती ही गंभीर असून सध्या आपल्याला दुष्काळाच्या झळांचा सामना करावा लागत असून पाणीसाठीदेखील कमी आहे. मग अशा परिस्थितीत आपला हॅन्डसम हंक स्वप्निल जोशी पुढे सरसावला असून तो नागरिकांना रंगांची होळी खेळू नका, पाणी वाचवा असा सामाजिक संदेश सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून देत आहे. स्वप्निल एका व्हीडीओच्या माध्यमातून सांगत आहे, आपण दरवर्षी होळीला रंगांची उधळण करतो. गेल्या वर्षी पाण्याचा साठा ४१ टक्के होता, तर या वर्षीची परिस्थिती त्यावरून गंभीर असून पाणीसाठा कमालीचा खाली म्हणजेच २६ टक्क्यांवर आला आहे. पुढचा महिना-सव्वा महिना पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे. ही परिस्थिती अतिशय भीषण आहे आणि त्यामुळेच मी या वर्षी पाण्याची, रंगांची होळी खेळणार नाही आणि तुम्हीही खेळू नका. सुका रंगदेखील खेळू नका, कारण सुका रंग काढायलादेखील पाणी लागते. या वर्षी आपण सर्व जण एकमेकांवर आयुष्यातील रंगांची उधळण करूयात. आनंदाचा, हसण्याचा आणि शुभेच्छांच्या रंगाने आपण एकमेकांना रंगवूयात. स्वप्निलने दिलेला हा सामाजिक संदेश नक्कीच सर्वजण अमलात आणतील अन् पाणी वाचविण्यास मदत करतील.> सोनाली कुलकर्णी ‘अप्सरा आली’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकविणारी सोनाली कुलकर्णी सांगते, ‘‘मी स्वत: होळी खेळत नाही. कारण मला कलरची फार भीती वाटते. पण तरुणांनो, सामाजिक भान म्हणून दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचा जास्त वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच चांगल्या क्वालिटीचे ड्राय कलर वापरा. कलर लावताना समोरील व्यक्तीच्या डोळ््यात जाणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.’’ >प्रार्थना बेहरे ‘मितवा,’ ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारखे हिट चित्रपट देणारी प्रार्थना बेहरे म्हणते, ‘‘होळी हा सण प्रॅक्टिकली साजरा करते. सध्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती चालू आहे. तसेच शहरात ही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून नागरिकांनी पाण्याचा न करता होळी साजरी करावी.’’ तसेच एक होळीचा अनुभवदेखील लोकमत सीएनएक्सशी शेअर करते, ‘‘काही वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी आॅडिशनला निघाले होते. त्या वेळी काही मुलांनी माझ्या अंगावर घाणेरड्या पाण्याने भरलेले फुगे फेकले होते. त्या वेळी खूप मानसिक त्रास झाला.’’ त्यामुळे विशेषत: लहान व तरुण मुलांना सांगते, ‘‘फुगे फेकून पाण्याचा मार देऊ नये. तसेच कोणाला जखम होणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी.’’> तेजस्विनी पंडित ‘गुलाबाची कळी’ या गाण्यातून तरुणांच्या मनावर राज्य करणारी तेजस्विनी पंडित म्हणते, ‘‘लहानपणापासून शिकविले जाते, की पर्यावरणाचा ऱ्हास करू नये. ही आपली नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. पण ऐन होळीच्या दिवशी या शिकवणीचा विसर सर्वांनाच पडलेला दिसतो. कारण या दिवशी झाडे तोडून त्याची होळी करतात. यावर उपाय म्हणून सुकलेला पालापाचोळ््याचा उपयोग करावा. तसेच यादिवशी सुकी होळी खेळा, असे म्हटले तरी, तोंड धुवायला पाणी वापरावं लागतंच ना, हाही विचार दुष्काळी स्थितीत करणे तितकेच आवश्यक आहे. त्यापेक्षा होळीदिवशी स्वत:च्या स्वभावातील वाईट गुणांचा त्याग करून आयुष्यात नवीन रंग भरण्याचा प्रयत्न करावा.पूजा सावंत ‘दगडी चाळ,’ ‘पोस्टर बॉइज’ या चित्रपटातून तरुणांची धडकन बनलेली पूजा सावंत म्हणते, ‘‘मी स्व:त इकोफ्रेंडली होळी साजरी करते. जास्त कलर व पाण्याचा वापर न करता फक्त कपाळाला साधा एक टिक्का लावून या सणाचा आनंद लुटते. तसेच आपला महाराष्ट्र हा कधी दुष्काळी नव्हता, पण आज जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी तरुणांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी पाण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.’’ प्रिया बापट ‘टाइमपास,’ ‘टाइमप्लीज’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी प्रिया बापट म्हणते, ‘‘आजच्या धावपळीच्या युगात सण साजरे करणे ही गरज बनली आहे. कारण सणाच्या निमित्ताने तरी सर्व लोक एकत्रित येऊन सणाचा आनंद लुटतात. आमची होळी म्हणजे एकत्रित येऊन पुरण-पोळ््यांच्या जेवणाचा आस्वाद लुटणे हा असतो. तसेच एक नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी पाळणे आवश्यक आहे. कारण सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे पाणी बचत करणे हादेखील देशसंवर्धन करण्याचा एक भाग आहे.’’ मराठी इंडस्ट्रीच्या या सुंदर अभिनेत्रींनी होळीनिमित्त दिलेला सामाजिक संदेश हा प्रत्येकाने अमलात आणणे गरजेचे आहे. तसेच या धावत्या युगात प्रत्येकाने एकत्रित येऊन प्रत्येक सण हा उत्साहाने साजरा करणे आवश्यक आहे. होळी या सणानिमित्त सर्वांना लोकमत सीएनएक्सच्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा.