रूपेरी पडद्यावर नात्यांना जीवापाड जपणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यात मात्र नात्यांचे संदर्भ रूपेरी पडद्यापेक्षा वेगळे असतात. इतरांसारखे त्यांच्यातही वादविवाद होतात आणि बराच काळ अबोलाही कायम असतो. यातून कुणीच सुटलेले नाही. अगदी महानायक अमिताभ बच्चनही नाहीत. याच यादीत पुढे नजर टाकली तर कधी राज बब्बर-प्रतीक बब्बर दिसतात तर कधी अमिषा पटेल आणि तिच्या पालकांतील संघर्ष नव्याने अधोरेखित होतो.प्रतीक - राज बब्बर दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिचा मुलगा असलेल्या प्रतीक बब्बरचे राज बब्बरसोबत वडील म्हणून असलेले संबंध चांगले नाहीत. प्रतीकने एका मुलाखतीत असे सांगितले की, त्याच्या वाढत्या वयात राज बब्बर त्याच्यासोबत कधीच नव्हते. ते त्यांच्या दुसऱ्या परिवारासोबत मग्न होते. त्यानंतर प्रतीकने बब्बर हे आडनाव लावणे सोडून दिले होते. अमिताभ बच्चन - अजिताभ बच्चनअजिताभ बच्चनने ज्या वेळी त्याच्या परिवारावर पुस्तक लिहिण्याचे जाहीर केले होते, त्या वेळेपासून अमिताभचे त्याच्यासोबत संबंध ताणलेले आहेत. कदाचित महानायकाला त्यांच्या भावाचे पुस्तक लिहिणे फारसे पसंत पडलेले नाही. कारण यातून परिवारातील अनेक गोष्टी समोर येऊ शकतात, अशी भीती त्यांना असू शकते.आदित्य नारायण -उदित नारायणअसेही ऐकण्यात आहे की आदित्य आणि उदित नारायण यांच्यातील संबंध फार बिघडले आहेत. उदितने सुरुवातीला आदित्यचे नाव अनेक निर्मात्यांना सुचविले होते. पण उदित जेव्हा बाह्यसंबंध प्रकरणात अडकला होता, तेव्हापासून दोघांमधील संबंध दुरावत गेले. एका महिलेने आदित्यवर तो तिचा नवरा असल्याचा दावा केला होता. रोहित शेट्टी - हृदय शेट्टीहृदय शेट्टी हा गोलमाल फेम रोहित शेट्टीचा सावत्र भाऊ आहे, जो स्वत: दिग्दर्शक आहे. त्याने चालिस चौराशी, प्यार मे टिष्ट्वट्स अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हृदय शेट्टीने रोहित शेट्टींसोबत असलेले संबंध नाकारले होते. आणि असा आरोप केला होता की, त्याच्या वडिलांना फक्त दोनच मुले आहेत. एक म्हणजे तो स्वत: आणि दुसरा उदय. त्यामुळे त्याला रोहितशी काहीही देणेघेणे नाही. असेही ऐकण्यात येते की, रोहित शेट्टीच्या अनेक अभिनेते मित्रांनी हृदय शेट्टींसोबत काम करण्यास नकार दिला होता. अमिषा पटेल - तिचे पालक कहो ना प्यार है या चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या या नायिकेचेसुद्धा तिच्या पालकांसोबत असलेले संबंध फारसे गोड नाहीत. या अभिनेत्रीने तर चक्क असा आरोप केला की, तिच्या वडिलांनी तिच्या पैशांचा गैरवापर केला आहे. हा संघर्ष इतका विकोपाला गेला होता की, अमिषाने तिचे घर सोडले होते आणि माध्यमांसमोर बोलताना तिच्या आईने तिला पायताणाने मारहाण केल्याचा आरोप केला होता.
सेलीब्रिटींचा अबोला!
By admin | Published: November 26, 2015 2:12 AM