Join us

सेलीब्रेटी गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2016 2:18 AM

मंगलमय उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. आपले बॉलीवूडचे सितारेदेखील गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करतात

गणेशोत्सवाची वाट प्रत्येक जणच आतुरतेने पाहत असतो. या मंगलमय उत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्वच उत्सुक असतात. आपले बॉलीवूडचे सितारेदेखील गणरायाच्या आगमनासाठी जय्यत तयारी करतात. अशाच काही ‘कलाकारांच्या बाप्पां’विषयी जाणून घेऊ या...सलमान खान : बॉलीवूडमध्ये सलमान खानच्या बाप्पाची जोरदार चर्चा असते. गेल्या अनेक वर्षांपासून सलमानच्या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. सलमानची आई महाराष्ट्रीय असल्याने खान फॅमिलीमध्ये गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. दीड दिवसाच्या बाप्पाची जय्यत तयारी गॅलेक्सीमध्ये सुरू असते. ढोल-ताशांच्या गजरात सलमानच्या बाप्पाची मिरवणूक दरवर्षी निघते.शिल्पा शेट्टी : गणेशभक्तांमध्ये शिल्पा शेट्टीदेखील आघाडीवर आहे. शिल्पा अनेक वर्षांपासून गणेशाची स्थापना घरी करते. लग्नानंतरदेखील ती राज कुंद्रासोबत तिच्या सासरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करते. राज, शमिता आणि मुलासोबत शिल्पाने नाचत-गाजत या वर्षीदेखील गणेशाचे स्वागत केले.आर.के.चा गणपती : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध घराणे मानल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबाचा गणेशोत्सवाचा मोठा इतिहास आहे. राज कपूर यांनी गणेशोत्सवाची परंपरा कपूर घराण्यात सुरू केली. आजपर्यंत ही परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीने यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. आर.के. स्टुडिओमध्ये गणेशाची स्थापना केली जाते.नाना पाटेकर : नानांच्या घरात अगदी मराठमोळ्या पद्धतीने विधिवत गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. नाना स्वत: गणेशाची स्थापना, पूजा आणि आरती करतात. तसेच नाना फुलांच्या मदतीने दरवर्षी स्वत: डेकोरेशनही करतात.जितेंद्र : जम्पिंग जॅक जितेंद्रच्या घरी दरवर्षी गणपतीची स्थापना केली जाते. कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन गणरायाच्या आगमनाची तयारी करतात. बॉलीवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याच्याआधी जितेंद्र गिरगावमध्ये राहात होते. दरवर्षी सर्वप्रथम तिथे जाऊन ते गणपतीची पूजा करतात. गोविंदा : गोविंदाच्या घरी ढोल-ताशांच्या गजरात दरवर्षी गणरायाची स्थापना केली जाते. गणरायासाठी आकर्षक आरास करून त्यामध्ये गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गोविंदा करतो. विवेक ओबेरॉय : विवेक ओबेरॉयची गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे. नुकतेच विवेकने त्याच्या यशस्वी चित्रपटांमागे गणेशाचे आशीर्वाद असल्याचे सांगितले. दरवर्षी विवेक त्याच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतो.हृतिक रोशन : हृतिक रोशन त्याच्या कुटुंबासोबत दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपतीची स्थापना करतो. आई, वडील, काका, आजी-आजोबा आणि मुलांसोबत तो हा सण साजरा करतो. तसेच विसर्जन मिरवणुकीतदेखील हृतिक जातीने उपस्थित असतो. अक्षय कुमार : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारदेखील त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत गणरायाच्या आगमनाची वाट पाहत असतो. अक्षयचे संपूर्ण कुटुंब मिळून गणरायाचे स्वागत करते.माधुरी दीक्षित : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितदेखील बाप्पाची भक्त आहे. माधुरी लग्नानंतर अमेरिकेत जरी काही वर्षे राहिली असली तरी तिने आपली परंपरा कायमच जोपासली आहे. अतिशय साध्या पद्धतीने माधुरी गणेशाची प्रतिष्ठापना दरवर्षी तिच्या घरी करते.