Join us

सेलीब्रिटींची वादग्रस्त टिवटिव

By admin | Published: August 06, 2015 11:24 PM

प्रासंगिक आणि ताज्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी अनेक सेलीब्रिटी टिष्ट्वटरचा वापर करतात. चित्रपट प्रदर्शनापूर्वी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी काही जण

प्रासंगिक आणि ताज्या घडामोडींवर भाष्य करण्यासाठी अनेक सेलीब्रिटी टिष्ट्वटरचा वापर करतात. चित्रपट प्रदर्शनापूर्वी आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी काही जण नित्यनियमाने टिष्ट्वटरवर उपलब्ध असतात. चाहते आणि फिल्म स्टार यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचे हे एक सुंदर माध्यम बनले आहे. परंतु काही सेलीब्रिटींनी याच माध्यमावर मोठ्या चुका करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर टिष्ट्वट करताना अभिनेत्री अनुष्का शर्माने चूक केली. ‘मिसाईल मॅन आॅफ इंडिया’ असे गौरविताना तिने ‘ए. पी. जे. कलाम आझाद’ असे लिहिले. स्वतंत्रतासेनानी मौलाना आझाद यांच्याशी तिने तुलना केली. या चुकीबद्दल तिला भयंकर टीकाही सहन करावी लागली. तिने चुकीच्या टिष्ट्वटमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला, मात्र टिष्ट्वटर वापरणाऱ्यांच्या ते लक्षात आल्यावाचून राहिले नाही.हृतिक रोशनलादेखील असाच अनुभव आला. मणिपूर घटनेबद्दल लिहिताना त्याने टिष्ट्वट केले की ‘मणिपूर येथील आदिवासींनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २० जवानांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या शोकसंवेदना आहेत. अभिवादन.’ त्यावर टिष्ट्वटरवरुन संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. एमएससंतोईषा यांनी टिष्ट्वट करताना हृतिकला म्हटले की, ‘अभिनेते केवळ गोड चेहऱ्याचे असतात. त्यांना मेंदू नसतो, असे लोकांनी म्हटले तर त्यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही’ अशाचप्रकारचे बरेचसे टिष्ट्वटही आले. अभिनेत्री श्रृती सेठ हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सेल्फी विद डॉटर’ विषयी केलेल्या टिष्ट्वटमुळे प्रचंड रागाचा सामना करावा लागला. त्याचवेळी नेहा धुपियाला मुंबईचा पाऊस आणि भाजपा सरकारवर योगासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटनंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या अपमानजनकस्पद वक्तव्यास सामोरे जावे लागले. नेहा धुपियाने म्हटले होते की ‘केवळ सेल्फी आणि योगा करण्याने गुड गव्हर्नन्स येत नाही. नागरिकांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली पाहिजे’ नेहा धुपिया, श्रृती सेठ, कविता कृष्णन यांनी केलेले टिष्ट्वट त्यादिवशी वादग्रस्त ठरले. सलील कपूर याने म्हटले होते की, ‘श्रृती सेठ, नेहा धुपिया या क श्रेणीच्या अभिनेत्रींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करुन स्वत:ला चमकविण्याचा प्रयत्न केला आहे.’एकंदर बॉलिवूडने टिष्ट्वटकडे गांभीर्यपूर्वक पाहिले पाहिजे. त्यांचा प्रत्येक फॉलोअर हा फॅन असतोच असे नाही.