Join us

'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये पहिले अतिथी म्हणून येणार हे कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 16:19 IST

विनोदी कलाकार सुनिल ग्रोव्हर आपला फॅमिली कॉमेडी शो 'कानपुर वाले खुराणाज्‌'सह परत येत आहे

ठळक मुद्देसुनिल ग्रोव्हर घेऊन येतोय विनोदी शो 'कानपुर वाले खुराणाज्‌' प्रथम सेलेब्रिटी अतिथी म्हणून येणार धर्मेद्र आणि बादशाह

विनोदी कलाकार सुनिल ग्रोव्हर आपला फॅमिली कॉमेडी शो 'कानपुर वाले खुराणाज्‌'सह परत येत आहे. ह्या शोमध्ये प्रथम सेलेब्रिटी अतिथी म्हणून बॉलीवूडमधील महान अभिनेता धर्मेद्र आणि किंग ऑफ रॅप बादशाह हे मनोरंजनाला एका वेगळ्‌या उंचीवर घेऊन जातील.

सूत्रांच्या माहितीनुसार, ''कानपुर वाले खुराणाज्‌' शो २०१८ मधील क्षणचित्रे मांडणार आहे. त्यामुळे धर्मेन्द्र आणि बादशाह हे ह्या शोसाठी सुयोग्य प्रथम अतिथी आहेत. धर्मेन्द्र आणि बादशाह ह्या वेगळ्‌या जोडीला पाहणे रोचक ठरेल. हा एपिसोड मनोरंजन आणि हास्याने पुरेपूर भरलेला असेल. ह्या एपिसोडमध्ये सर्व कलाकार धर्मेन्द्र यांचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार आहे आणि बादशाह आपले पहिले गीत परफॉर्म करणार आहे.'अतिशय विनोदी अशा स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू टेलिव्हिजनवर सूत्रसंचालकाच्या रूपात पदार्पण करणार आहे. त्याच्यासोबत ह्या शोमध्ये अलि असगर, उपासना सिंग आणि सुगंधा मिश्रासुद्धा दिसणार आहेत.स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू कॉमेडी शोमॅन सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येईल आणि प्रेक्षकांचे निश्चितपणे तुफान मनोरंजन होईल. 'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. कुणालला छोट्या पडद्यावर कॉमेडी करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्धमेंद्रबादशहा