Join us

सेलेब्सची ‘फॅट टू फिट’ जर्नी!

By admin | Published: June 24, 2017 1:19 AM

‘फिटनेस’ हा विषय सेलिब्रिटींच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा. जीमला जाणे, डाएट फॉलो करणे या सर्व बाबी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत.

- अबोली कुलकर्णी‘फिटनेस’ हा विषय सेलिब्रिटींच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा. जीमला जाणे, डाएट फॉलो करणे या सर्व बाबी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मात्र, सध्याचे टॉपचे काही सेलिब्रिटी असे आहेत, की जे अगोदर खूप जास्त प्रमाणात फॅट होते. ग्लॅमरच्या दुनियेत येण्यासाठी त्यांनी मग स्वत:ला फिट बनवले. त्यांचा ‘फॅट टू फिट’ हा प्रवास काही सोपा नव्हता. सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान ही ‘के दारनाथ’च्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे. ती देखील या झगमगाटात येण्याअगोदर खूप फॅट होती. तिने स्वत:ला स्लिम फिट बनवले. ‘बी टाऊन’मध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचा ‘फॅट टू फिट’ प्रवास आपण पाहायलाच हवा....सारा अली खान किशोरवयीन वयापर्यंत सारा ही खूपच ओव्हरवेट होती. जेव्हा तिला बॉलिवूडमधील डेब्यूचे वेध लागले त्यावेळी तिने सर्वप्रथम स्वत:च्या वजनावर काम करायला सुरुवात केले. डेली वर्कआऊटस, हेवी डाएटिंग करून तिने झिरो फिगर करण्याचा प्रयत्न केला. आता ती ‘केदारनाथ’ मधून तिचा बॉलिवूड डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.जॅकी भगनानीबॉलिवूडच्या सर्वांत तरुण अभिनेत्यांपैकी एक म्हणून जॅकी भगनानी याच्याकडे पाहिले जाते. तो इंडस्ट्रीत येण्याअगोदरच त्याला कळून चुकले की, त्याचे वजन खूप जास्त आहे. मग काय त्याने बॉलिवूड डेब्यूसाठी वजन घटवण्याची तयारी सुरू केली. हॅण्डसम आणि कूल फिजीक असलेली बॉडी बनवण्यात त्याची काही वर्षे गेली.सोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा हिचे बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याअगोदर वजन ९० कि लो होते. मात्र, तिच्या बॉलिवूड डेब्यूची वेळ जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी तिच्या वाढलेल्या वजनाचा प्रश्न तिला सतावू लागला. पण, ‘दबंग’ रिलीज होण्यापूर्वी तिने जवळपास ३० किलो वजन घटवले.सोनम क पूर ‘बॉलिवूडची फॅशनिस्टा’ सोनम कपूर हिचे रेड कार्पेटवरील फोटो आपल्याला घायाळ करतात. चाहते तिच्या स्लिम फिटचे अक्षरश: दिवाने आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, ती पूर्वी फारच फॅट होती, ही फिगर आणण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले. इच्छाशक्तीच्या बळावर तिने सध्याची फिगर मेंटेन केली.