Join us

‘गली बॉय’च्या चुंबन दृश्यावर सेन्सॉर बोर्डाची कात्री!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 15:21 IST

रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा ‘गली बॉय’ येत्या १४ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण रिलीजपूर्वी या चित्रपटात काही बदल करण्यात आल्याची खबर आहे.

ठळक मुद्दे‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा ‘गली बॉय’ येत्या १४ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण रिलीजपूर्वी या चित्रपटात काही बदल करण्यात आल्याची खबर आहे. होय, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक दृश्यांवर कात्री लावली आहे. यापैकी एक सीन म्हणजे, रणवीर व आलियाच्या चुंबनाचा. सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानुसार, चित्रपटातील १३ सेकंदाच्या एका चुंबन दृश्याला कात्री लावली गेली. इतकेच नाही तर या दृश्याला ‘वाईडर शॉट’मध्ये बदलण्यात आले. म्हणजे, आता चित्रपटात आलिया व रणवीर जवळून किस करताना दिसणार नाहीत. चित्रपटाच्या ब्रांड पार्टनरच्या यादीतून ‘रॉयल स्टेग’चे नावही गाळण्यात आले आहे. चित्रपटातून मादक पदार्थांची जाहिरात होता कामा नये, असे सेन्सॉर बोर्डाचे मत आहे. यापूर्वी चित्रपटात कुठल्याही उत्तेजक व मादक पदार्थाचे नाव ब्लर केले जात असे. पण पहिल्यांदाच ब्रांड पार्र्टनरच्या यादीतून एका मादक पदार्थाच्या ब्रांडचे नाव गाळण्यात आले आहे. ‘गली बॉय’ अनेक ठिकाणी वापरले गेलेले आक्षेपार्ह शब्द व शिव्यांना बिपसोबत दाखवले जाणार आहे. 

रणवीर व आलियाचा ‘गली बॉय’ प्रदर्शनाआधीच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये या  चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमिअर झाले. याठिकाणी ‘गली बॉय’वर कौतुकाचा वर्षाव झाला. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगआलिया भट