केदार लेले/ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 26 - मराठी माणसाच्या हृदयाजवळ काय असेल तर ते म्हणजे मराठी नाटक, सिनेमा आणि क्रिकेट. 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटामुळे संगीत नाटकाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. संगीत नाटकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन अधिकाधिक तरुणाई नाटकाकडे आकर्षित व्हावी म्हणून 'संगीत संशयकल्लोळ' या नाटकाच्या "टीम"ने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाटकाचा प्रचार-प्रसार केला.संशयकल्लोळ या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने पुण्यातच 1916 मध्ये सादर केला होता. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे वर्ष या नाटकाचे शताब्दी वर्ष आहे. हेच औचित्य साधून राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले नाटकाचा प्रयोग लंडनमधील पीकॉक थिएटरमध्ये सादर करत आहेत.
आणखी वाचा
‘संशयकल्लोळ’ची शताब्दीलंडनमधील वेस्ट एन्ड ही जागा म्हणजे चित्रपट व नाट्यसंस्कृतीची भूमी. १०५ वर्षे गाठलेल्या पीकॉक थिएटरमध्ये नाटकाचा शताब्दी वर्ष प्रयोग सादर होणे म्हणजे दुग्ध-शर्करा योग आहे. आणि ही संगीत नाट्यरसिकांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी युके मधील मराठी नाट्यरसिकांचा प्रतिसाद मिळेल यात तिळमात्र शंका नाही.संगीत नाटकांच्या इतिहासात गाजलेले नाटक म्हणून गो. ब. देवल यांच्या "संशयकल्लोळह्यकडे पाहिले जाते. एखाद्या नाटककाराचं नाटक त्याच्या मृत्युपश्चात रंगभूमीवर येऊन त्याने तब्बल शतकभर रसिकांना मोहिनी घालावी, हा चमत्कारच म्हणावा लागेल. संशयकल्लोळ या नाटकाची जादू अजून ओसरलेली नाही.हे नाटक अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत, विशेषत: तरुणांपर्यंत पोचावे म्हणून सध्या विशेष प्रयत्न होत आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी करीत असून प्रशांत दामले (फाल्गुन राव), राहुल देशपांडे (अश्विन शेठ), उमा पळसुले-देसाई (रेवती), दिप्ती माटे (कृतिका), चिन्मय पाटसकर (साधू आणि वैशाख), नचिकेत जोग (भाद्व्या), नीता पेंडसे( रोहिणी आणि मघा) हे मुख्य भूमिका साकारत आहेत.संगीत संशयकल्लोळलेखक :- गोविंद बल्लाळ देवलसंकलन, दिग्दर्शन :- निपुण धर्माधिकारीनेपथ्य :- बाबा पार्सेकर पार्श्वसंगीत:- गंधार संगोरामकलाकार :- राहुल देशपांडे, प्रशांत दामले