अभिनेत्री सागरिका घाटगे(Sagarika Ghatge)ला चक्क दे इंडिया या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे तिला चक दे गर्ल असेच म्हटले जाते. सागरिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. २०१७ मध्ये सागरिकाने क्रिकेटर झहीर खानबरोबर लग्न केले. लग्नानंतर काही काळ सिनेइंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता सागरिकाने तिच्या नव्या बिझनेसची घोषणा केली आहे. तिने कपड्याचा नवीन ब्रॅण्ड लॉंच केला आहे.
अभिनेत्री सागरिका घाटगे हिने नुकताच कपड्यांचा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे. अकुती असं तिच्या नवीन ब्रँडचं नावं आहे. मुंबईत पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात तिने नवनवीन ड्रेस आणि साड्यांची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली. पारंपरिक साड्यांना मॉडर्न वेस्टर्न टच दिला आहे. या बिझनेसमध्ये तिला तिची आई उर्मिला यांचे सहकार्य लाभले आहे.
सागरिकाचा जन्म एका शाही कुटुंबात झाला आहे. तिची आजी सीता राजे घाडगे या इंदौरच्या महाराजा तुकोजीराव होळकर यांच्या कन्या होत्या. सागरिकाला शिक्षणादरम्यान अनेक सिनेमा आणि जाहिरातींच्या ऑफर यायला लागल्या होत्या. मात्र तिच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. 'चक दे इंडिया' चित्रपटातून सागरिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१३ मध्ये आलेल्या रश या चित्रपटात ती इमरान हाश्मी सोबत दिसली होती. हिंदीशिवाय सागरिकाने पंजाबी आणि मराठी चित्रपटातही काम केले आहे.