महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेलं मराठमोळं नाव म्हणजे भाऊ कदम (bhau kadam). विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदम यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकताच त्यांच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील कलाकार सध्या चर्चेत आहेत. परंतु, भाऊ कदम हे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत येत आहेत. नुकताच त्यांनी त्यांच्या पत्नीचा एक फोटो शेअर केला असून तिच्यावरचं प्रेम व्यक्त केलं आहे.
भाऊ कदम यांचा सोशल मीडियावर दांडगा वावर आहे. त्यामुळे ते वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असतात. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यांच्या पत्नीचा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ममता कदम यांचा बदललेला लूक दिसून येत आहे.
भाऊ कदम यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ममता यांचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या नव्या लूकच्या प्रेमात भाऊ कदम पडले असून Love असं कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान, भाऊ कदम आणि ममता यांचं लव्ह मॅरेज आहे हे फारसं कोणाला माहित नाही. एका कार्यक्रमात भाऊ कदम यांनी ममता यांना पाहिलं होतं. भाऊ कदम यांचं त्यांच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असून ते कायम त्यांच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. इतकंच नाही तर बिझी शेड्युलमधून वेळ काढत ते कुटुंबासोबत फॅमिली टाइमही घालवतात.