Join us

लग्नाच्या वाढदिवशी भाऊ कदम झाला रोमॅण्टिक; बायकोला दिलं महागड गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 17:36 IST

Bhau kadam: भाऊ कदमचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे आणि त्याचं हे प्रेम कायम त्याच्या कृतीतून दिसून येतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकाच गुणी अभिनेता म्हणजे भाऊ कदम (bhau kadam). 'चला हवा येऊ द्या' म्हणत त्याने आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. भाऊ कदमचं नाव आज प्रसिद्ध विनोदवीरांमध्ये घेतलं जातं. मात्र, विनोदवीर असण्यासोबतच तो तितकाच उत्तम अभिनेतादेखील आहे. आजवर त्याने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्धी, यश, संपत्ती उपभोगणारा भाऊ खऱ्या आयुष्यात प्रचंड साधा आहे. नुकताच त्याने त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने त्याच्या बायकोला छानसं गिफ्ट दिलं.

भाऊ कदमचं त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे आणि त्याचं हे प्रेम कायम त्याच्या कृतीतून दिसून येतं. अलिकडेच भालचंद्र कदम आणि त्याच्या पत्नीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा एक छानसा व्हिडीओ त्याच्या लेकीने मृण्मयीने तिच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. या वाढदिवसाचं निमित्त साधत भाऊने त्याच्या बायकोला एक सुंदर भेटवस्तू दिली.

भाऊने काय दिलं बायकोला गिफ्ट?

भाऊ कदमने त्याच्या बायकोला सुंदर झुमके गिफ्ट केलं आहे. यात त्याने दिलेल्या झुमक्यावर एक सुंदर नाजूक डिझाइन असून त्यावर डायमंड बसवले आहेत. तर, त्याच्या पत्नीनेही त्याला सोन्याचं ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आहे.

टॅग्स :भाऊ कदमसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन