Join us

'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरेंच्या पत्नीला पाहिलंत का?, त्यांच्या सुखी संसाराला झालीत २१ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 8:00 AM

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या पत्नी खूप सुंदर दिसतात. त्या लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात.

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) शो २०१४ सालीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील कलाकारांनी आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. या शोमधून अभिनेता भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) लोकप्रिय झाले. या शोमधील कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारत गणेशपुरे यांच्या पत्नीबद्दल...

भारत गणेशपुरे यांच्या पत्नीचे नाव अर्चना गणेशपुरे आहे. त्या देखील दिसायला खूप सुंदर आहेत. भारत गणेशपुरे आपल्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या मुलाचाही फोटो शेअर करत असतात. भारत गणेशपुरे आणि अर्चना गणेशपुरे यांच्या लग्नाला नुकतेच २१ वर्षे झाले आहेत. 

भारत गणेशपुरे यांनी काही वर्षांपूर्वी अर्चना यांच्यासोबत दुसऱ्यांदा लगीनगाठ बांधली होती. त्यांनी पत्नीसोबत पुन्हा लग्न करण्यामागेदेखील एक विशेष कारण आहे. असे झाले की, 'चला हवा येऊ द्या'ची टीम काही वर्षांपूर्वी विदेशात दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भारत गणेशपुरे यांना सौम्य अटॅक आला होता. भारत गणेशपुरे यांचा ज्योतिष शास्त्रावर फार विश्वास आहे. त्यांनी तातडीने ज्योतिषाकडे हात दाखवला. तर त्यांच्या गुरुजींनी त्यांना पुन्हा एकदा लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अभिनेत्याने पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला होता. पुन्हा एकदा त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले होते.

भारत गणेशपुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. शेवटचे ते हेलो चार्ली या हिंदी चित्रपटात झळकले होते.

टॅग्स :भारत गणेशपुरेचला हवा येऊ द्या