‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोमधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) यांच्याबद्दल सगळेच जाणतात. शून्यातून विश्व निर्माण करणा-या भाऊ कदम यांचा जन्म मुंबईच्या वडाळा या भागात झाला होता. त्यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करत होते. काही वषार्नंतर वडिलांचे निधन झाले आणि झाल्याने सर्व जबाबदारी भाऊंच्या खांद्यावर आली. भाऊ नाटकांत काम करून पैसे मिळवत. पण ते पुरेसे नव्हते. अशात भाऊंनी पैशांसाठी अगदी पानसुपारी विकण्याचेही काम केले. अशात एक दिवस अभिनेते विजय कदम त्यांच्या घरी आले आणि त्यांना पुन्हा नाटकात काम करण्यास सांगितले. त्यानंतर भाऊ कदम यांनी पुन्हा नाटकामध्ये काम करण्यास सुरुवात केली. मालिका, चित्रपट असा त्यांचा प्रवास सुरू झाला आणि यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात आज आम्ही भाऊ कदमांबद्दल नाही तर त्यांची लाडकी लेक मृण्मयी कदम (Mrunmayee Kadam) हिच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
मृण्मयी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. मृण्मयीने के. जी. जोशी आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केले. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे आणि त्याचे हजारो सबस्क्राइबर्स आहेत.
मृण्मयीशिवाय भाऊला दोन मुली आणि एक मुलगा आहे, संचिता, समृद्धी व आराध्य अशी त्यांची नावं.
मृण्मयीच्या नामकरण एका मालिकेवरून झाले होते. म्हणजेच त्यामागेही एक किस्सा आहे. ‘मृण्मयी’ नावाची एक मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेवरूनच आजीने नातीचे मृण्मयी असे नामकरण केले होते.
सोशल मीडियावर पारंपरिक तसेच वेस्टर्न पोशाखातले अनेक फोटो मृण्मयी शेअर करत असते.
आता बाबाच्या पावलावर पाऊल टाकत ती अभिनयक्षेत्रात येणार का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नक्कीच. चांगली संधी मिळाली तर ती यासाठी अगदी सज्ज आहे.