Join us

Kushal Badrike : "कोडं सुटलं नाही तर खेळ सोडता येतो, पण आयुष्य.."कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 1:46 PM

कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून घराघरात पोहचला आहे. आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले. त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रीय असून तो फोटो आणि पोस्ट शेअर करत असते. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबतचे अपडेट्स ही तो चाहत्यांना देत असतो. कुशनले त्याच्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटोत पोस्ट करताना  त्याच्या लहान मुलाने रुबीक क्यूब सोडवल्याचे सांगितले आहे. 

कुशलची पोस्ट माझ्या मुलाला हे असले खेळ खूप आवडतात, त्याला Rubik’s cube भारी सोडवता येतं, तो पुन्हा पुन्हा ते shuffle करुन पुन्हा पुन्हा सोडवतो. मला खूप प्रयत्न करुन पण ते कोडं सोडवणं कधीच जमलं नाही. बर अख्ख जाऊदे, त्याची नुसती एक बाजू सुद्धा कधी clear करता आली नाही. म्हणूनच मला हे rubik’s cube, आयुष्या सारखं वाटतं .“आपणच गुंता वाढवायचा आणि आपणच सोडवत बसायचं”. मला, ना-कधी rubik’s cube सोडवता आलं, ना आयुष्य. कोडं सुटलं नाही तर खेळ सोडता येतो, आयुष्य कसं सोडायचं?:- सुकून

कुशलच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या