'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. सागरचं कॉमेडीचं टायमिंग इतकं सहज आहे की, प्रेक्षक त्याच्या विनोदांना दाद दिल्यावाचून राहत नाहीत. इंटरनेट, इ-मेल, मोबाइलच्या काळात पोस्टमन ही संकल्पना इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती. परंतु ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात सागरने साकारलेला पोस्टमन पाहून प्रेक्षक नॉस्टाल्जिक झाले. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
पोस्टमन काकांनी तर आपल्या सर्वांच्या मनातले प्रश्न जनतेसमोर आणले. सागर कारंडेनं ही पोस्टमन काकाची भूमिका अगदी चोख पद्ध्तीने पार पाडली. सागर कारंडेचा आवाज, पत्र वाचताना आलेल त्यांच्या डोळ्यातलं पाणी, त्यांच पोस्टमन काकांच लुक सगळ्या आवडलं एवढच काय तर प्रेक्षक या पोस्टमन काकांची जणू काय वाटच बघू लागले मात्र आता सागर कांरडे पोस्टमन काकांच्या भूमिकेत झळकणार का हा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे कारण स्वप्निल जोशी या येत्या भागात पोस्टमन काकांची भूमिका साकारली असल्याकारणाने आता सागर कांरडे हा चला हवा येऊ त्यामध्ये दिसणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाटक करण्याचा ध्यास असलेल्या सागरचा जीव नोकरीत रमेनासा झाला. अखेर सागरनं नोकरी सोडत पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरण्याचा निर्णय घेतला.