कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी एक काळ प्रचंड गाजावला. मात्र, काळाच्या ओघासोबत ते कलाविश्वापासून आपोआप दूर झाले. यामधलाच एक अभिनेता म्हणजे चंद्रचूड सिंह. 'जब प्यार किया तो डरना क्या', 'तेरे मेरे सपने', 'माचिस' अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटात चंद्रचूड झळकला. मात्र, त्याच्या एका हट्टापायी त्याने त्याच्या फिल्मी करिअरची वाट लावली. एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्यदेखील केलं आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जोश' चित्रपटात चंद्रचूड सिंह याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेचं सोशल मीडियावर कौतुकही झालं होतं. मात्र, या चित्रपटानंतर त्याचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मध्यंतरी त्याने सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या 'आर्या' या वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा कलाविश्वात पदार्पण केलं. मात्र, त्याच्या अभिनयाची जादू फारशी चालली नाही.
"त्यावेळी मी चांगल्या भूमिकांच्या शोधात होतो. मला उत्तम रोल करायची इच्छा होती. या काळात मला अनेक चांगल्या भूमिकाही आल्या. परंतु, काही तरी वेगळं करायचं या नादात मी अनेक भूमिका नाकारल्या. एक प्रकारे मीच स्वत:ला चित्रपटांपासून दूर केलं", असं चंद्रचूड म्हणाला.
'मेरे ख्यालों की मल्लिका'! जोशमधील 'ती' अभिनेत्री सध्या काय करते माहितीये?
पुढे तो म्हणतो, "२००० मध्ये माझा एक मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये माझ्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे यातून बाहेर यायलाच मला १० वर्ष लागले. हा १० वर्षांचा कालावधीदेखील खूप मोठा होता. ज्याचा परिणामही माझ्या करिअरवर झाला."
दरम्यान, २०१२ मध्ये चंद्रचूडने पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण केलं. यावेळी त्याने जिल्हा गाझियाबाद वगैरेसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, पूर्वीसारखी जादू तो प्रेक्षकांवर करु शकला नाही. चंद्रचूडने त्याच्या करिअरमध्ये यादवी – दि डिग्निफाइड प्रिन्सेस, ‘तेरे मेरे सपने’, ‘माचिस’, ‘क्या कहना’, ‘जोश’ आणि ‘दागः द फायर’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.