सध्या सगळीकडे साऊथच्या सिनेमांची चर्चा होत असली तरी यात मराठी सिनेमेही मागे नाहीयेत. मराठीतही एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे येत आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती अमृता खानविलकर (Amrita Khanvilkar) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्या 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमाची. यातील अमृताची लावणी, तिचा लूक आणि खास कथानकाची जोरदार चर्चा रंगली असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकताही वाढली आहे. अशात आता तुम्हाला संधी मिळणार आहे ती 'चंद्रमुखी' सिनेमातील अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत भेटण्याची. इतकंच नाही तर या सिनेमाच्या प्रिमिअर शोचं तिकीटही तुम्ही जिंकू शकता.
चंद्राची भूमिका साकारणारी अमृता खानविलकर आपल्या लूकने आणि बहारदार नृत्याने फॅन्सचं मन जिंकत आहे. अशात तिला भेटण्यासाठी फॅन्स आतुर आहेतच. अशात आता तुमच्याकडे तिला भेटण्याची आणि सिनेमाच्या प्रिमिअरचे तिकीट जिंकण्याची संधी चालून आली आहे. यासाठी Lokmat Filmy आणि Planet Marathi यांनी एक कॉन्टेस्ट आयोजित केला आहे.
तुम्हाला अमृताला भेटायचं असेल तर काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला 'चंद्रमुखी लावणी कॉन्टेस्ट' मध्ये सहभागी व्हावं लागेल. यात तुम्हाला सिनेमातील 'चंद्रा' या गाण्यावर डान्स रील बनवावा लागेल. हा कॉन्टेस्ट १९ ते २७ एप्रिल २०२२ दरम्यान असेल.
खालील स्टेप्स फॉलो करा.
- 'चंद्रा' गाण्यावरील डान्स रील रेकॉर्ड करा
- Reels Music Library मधून 'चंद्रा' गाणं सिलेक्ट करा.
- हा डान्स रील अपलोड करताना #ChandramukhiContest असा हॅशटॅग वापरा.
- तुम्ही हा डान्स व्हिडीओ आम्हाला WhatsApp देखील करू शकता. 8291232354 या नंबरवर तुम्ही व्हिडीओ पाठवू शकता.
नियम व अटी -
- फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईक्स वरून विजेता निवडला जाणार नाही.
- अंतिम निर्णय आयोजकांचा असेल.
- फेक अकाऊंट्सना टॅग करणाऱ्यांना बाद केले जाईल.
दिग्दर्शक प्रसाद ओक आता 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे.
तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'चंद्रमुखी'मध्ये पाहायला मिळणार आहे.
'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.