Kartik Aaryan Chandu Champion : अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामुळे चर्चेत आहे. स्पोर्ट्स ड्रामा फिल्म 'चंदू चॅम्पियन' हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक मुरलीकांतची भूमिका साकारत असून हा चित्रपट आज (१४ जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चाहते या सिनेमाची आतुरतने वाट पाहत होते. चाहत्यांना हा सिनेमा फक्त 150 रुपयांत पाहता येणार आहे.
कबीर खानने हा सिनेमा दिग्दर्शित केला. तर साजिद नाडियादवाला आणि कबीर खान यांनी संयुक्तपणे सिनेमाची निर्मित केली आहे. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी निर्मात्यांकडून एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. फक्त आज शुक्रवारी (१४ जून) देशभरात सिनेमाच्या तिकीटाची किंमत ही फक्त १५० आहे. कुठल्याही थिएटरमध्ये तुम्ही 'चंदू चॅम्पियन' हा सिनेमा फक्त 150 रुपयांमध्ये पाहू शकता.
बहुतेक शहरांमध्ये सामान्य तिकिटाची किंमत 200-400 रुपयांपेक्षा अधिक असते. ही रक्कम बऱ्याच लोकांसाठी खूप जास्त आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यां आणि सामान्य माणूस चित्रपटासाठी इतके पैसे खर्च करु शकत नाहीत. सामान्य नागरिकांना आणि तरुणांना श्री पेटकर यांचा अविश्वसनीय प्रवास पाहता यावा, यासाठी निर्मात्यांनी आज ही ऑफर ठेवली आहे.
कमी तिकीट किमतीमुळे चित्रपटगृहांमध्ये अधिक गर्दी होऊ शकते. फक्त भारतामध्येच नाही तर लॅटव्हिया, एस्टोनिया, लिथुआनिया आणि जॉर्जियासारख्या 70 हून अधिक देशांमध्ये हा सिनेमा प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 1000 हून अधिक ठिकाणी आणि 1300 हून अधिक स्क्रीनवर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे कार्तिकचा हा आतापर्यंतचा पाहिला चित्रपट आहे, जो ऐवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशात रिलीज होतोयं.