Join us

'मला मारझोड केली, शिव्या दिल्या..', चारू असोपानं राजीव सेनची केली पोलखोल, होणार विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:23 PM

Charu Asopa Accused Rajeev Sen: चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनात पुन्हा वादळ आले आहे. नुकतेच अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले की तिला राजीव सेनसोबत घटस्फोट घ्यायचा आहे.

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि मॉडेल राजीव सेन (Rajeev Sen) यांच्या वैवाहिक जीवनात पुन्हा एकदा वादळ आले आहे. यावेळी अभिनेत्रीने राजीव सेनवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे. इतकेच नाही तर तिने आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ती तिच्या निर्णयावर ठाम राहणार असल्याचेही म्हटले आहे.

चारू असोपाने मुलाखतीत असेही सांगितले की, आता तिने राजीव सेनपासून विभक्त होण्याचे ठरवले आहे, तसेच ती या प्रकरणातून मागे हटणार नाही. चारू असोपा म्हणाली की राजीव सेनसोबतचे लग्न वाचवण्यासाठी तिने शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या पतीची पोलखोल केली आहे आणि त्याने चारूलाही ब्लॉक केल्याचेही सांगितले.

याबद्दल चारू असोपा म्हणाली, "लग्न संपवण्याच्या उद्देशाने कोणीही फेरे घेत नाही. मला माझ्या निर्णयावर पश्चाताप करायचा नव्हता, म्हणून मी माझे लग्न वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कारण ते माझे दुसरे लग्न होते. या सगळ्यात माझीच खिल्ली उडते होती.  पण मला वाटलं लग्न चालेल. पण हे करता करता तमाशा बनत चालला आहे. मला वाटतं आम्ही एकमेकांसाठी बनलेले नाही आहोत. हे लग्न आता कधीच चालणार नाही."

चारू असोपा यांनी सांगितले की, राजीव सेनची सर्वात मोठी समस्या ही होती की तो प्रत्येक भांडणानंतर तिला एकटे सोडायचा आणि ब्लॉक करायचा. याबाबत बोलताना चारू असोपा म्हणाली, "आमचे लग्न झाल्यापासून आमची भांडणे होत आहेत. प्रत्येक भांडणानंतर राजीव गायब व्हायचा आणि मला ब्लॉक करायचा, जेणेकरून मी त्याच्याशी संपर्क करू नये. लॉकडाऊनच्या काही दिवस आधीपासून, त्याने मला तीन महिन्यांसाठी एकटे सोडले. मला कळले की तो ४५ वर्षांचा आहे आणि मी त्याला बदलू शकत नाही. पण मी माझ्या मुलीसाठी प्रयत्न करत होते.

चारू असोपाने सांगितले की, राजीव सेनने तिच्यावर अनेकदा हात उचलला आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "राजीवचा राग विचित्र आहे. त्याने मला अनेकवेळा शिवीगाळ केली आणि एक-दोन वेळा हात उगारला आहे. मी फसवणूक करत असल्याचा त्याला संशय होता. 'अकबर का बाल बिरबल' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही तो माझ्या सहकलाकारांना माझ्यापासून दूर राहण्यासाठी मेसेज करायचा."

टॅग्स :सुश्मिता सेन