Charu & Rajeev: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पती राजीव सेनसोबत रोमाँटिक झाली चारु असोपा, लोक म्हणाले-लग्नाची थट्टा मांडलीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:57 PM2023-02-28T12:57:51+5:302023-02-28T13:12:34+5:30

चारू असोपा आणि राजीव सेन यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, मात्र ते वेगळे राहत आहेत. यादरम्यान दोघांचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झालेत.

Charu asopa reacted on rajeev sen making her birthday special says thanks to him watch post | Charu & Rajeev: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पती राजीव सेनसोबत रोमाँटिक झाली चारु असोपा, लोक म्हणाले-लग्नाची थट्टा मांडलीय

Charu & Rajeev: घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पती राजीव सेनसोबत रोमाँटिक झाली चारु असोपा, लोक म्हणाले-लग्नाची थट्टा मांडलीय

googlenewsNext

Charu Asopa Rajeev Sen Photos: टीव्ही अभिनेत्री चारू असोपाचे वैयक्तिक आयुष्य रोलर कोस्टर राईडसारखे होते. मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन(Sushmita Sen) चा भाऊ राजीव सेन(Rajeev Sen) सोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. आजकाल दोघेही आपापले वेगळे आयुष्य जगत आहेत, पण एकमेकांशी चांगले संबंध आहेत. नुकताच राजीवने चारुसोबतचे फोटो शेअर केलेत.

चारुने राजीवसोबत सेलिब्रेट केला बर्थडे
27 फेब्रुवारी 2023 रोजी चारू असोपाचा 35 वा वाढदिवस होता. चारूने तिचा बर्थ डे राजीव सेनसोबत साजरा केला. दोघांनी एकत्र खूप एन्जॉय केलं, ज्याची झलक त्यांनी इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोंमधून दिसतेय. चारूला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना राजीवने अनेक फोटो शेअर केले, ज्यामध्ये त्यांच्यातील बॉन्ड पाहायला मिळतोय. एका फोटोत दोघे रोमँटिक होतानाही दिसला होता.

चारू असोपाने राजीवने तिचा बर्थडे स्पेशल केल्याबद्दल आभार मानले आहेत. चारूने राजीवसोबतचे फोटोही शेअर केले आहेत, ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “धन्यवाद राजीव. खूप छान दिवस होते. माझा वाढदिवस इतका खास बनवल्याबद्दल धन्यवाद. 

चारू आणि राजीवचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता लोकही गोंधळले आहेत. एका यूजरने कमेंट केली की, "या दोघांमध्ये काय चालले आहे ते समजत नाही. नुकताच घटस्फोट घेतला होता आणि आता ते एकत्र दिसत आहेत." तर तिथे आणखी एका यूजरने लिहिले की, "कधी त्यांचा घटस्फोट होतो तर कधी ते एकत्र असतात. लग्नाची थाट मांडली आहे. 
 

चारू असोपा आणि राजीव सेन यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही, मात्र ते वेगळे राहत आहेत. चारूने सांगितले होते की, घटस्फोटाची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. दोघे आता कपल म्हणून एकत्र नाहीत, पण त्यांची मुलगी जियानाचा एकत्र संभाळत करतील. दोघांनीही आपल्या मुलीबद्दलच्या तक्रारी दूर केल्या आहेत. आता त्यांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी अंदाज बांधला आहे की कदाचित दोघेही पुन्हा एकत्र येऊ शकतात.
 

Web Title: Charu asopa reacted on rajeev sen making her birthday special says thanks to him watch post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.