आज देशात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूडदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विविध डिजिटल माध्यमांवर एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत वेबसीरिज रिलीज केले आहेत. हे सीरिज पाहून तुम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करू शकता.
कोड एम ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि झी ५ वर आहे. यामध्ये दहशतवादी चकमकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या भारतीय लष्कराच्या वकीलाची स्टोरी यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चकमकीत २ दहशतवादी मारले गेले आणि एक सैनिक शहीद झाला होता. मोनिका मेहरा नावाच्या एका वकिलाने या प्रकरणाचा तपास केला आणि त्यातले सत्य समोर आले.
राजकुमार रावची बोस डेड ही वेब सीरीज ऑल्ट बालाजीवर आहे. यात राजकुमार रावने सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. यात नेताजींच्या तरूणापासून ते स्वातंत्र्यलढ्यापर्यंतच्या जवळपास सर्व घटना दर्शविल्या गेल्या आहेत. या व्यतिरिक्त, त्याच्या मृत्यूची न सुटलेली कथा देखील दर्शविली गेली आहे.
ऑल्ट बालाजीवर द टेस्ट केस ही वेब सीरिज आहे. याची स्टोरी सेना आणि पुरुषप्रधान देशावर आधारित आहे. कॅप्टन शिखा शर्मा म्हणजेच निमरत कौर ही महिला सैनिक असून पुरुषप्रधान देशात आपली ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. या वेब सीरिजमध्ये निमरत कौर व्यतिरिक्त अक्षय ओबेरॉय, राहुल देव, अतुल कुलकर्णी आणि अनूप सोनी हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर जूही चावला संरक्षणमंत्री म्हणून यामध्ये भूमिका साकारली आहे.
ऑफिसर मेजर दीप सिंग यांच्या जीवनावर आधारित झी ५ वर जीत की जिद ही वेब सीरिज आहे. कारगिलमध्ये ऑपरेशन दरम्यान मेजर दीप सिंग गंभीर जखमी झाले होते. अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन त्यांनी हार न मानता संघर्ष करत परत आले असे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. अमित साध, अमृता पुरी, सुशांत सिंग या वेब सीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.