बॉलिवूड अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)च्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजून विक्रमी कमाई करताना दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत ५९८.८ कोटी रुपयांचं कलेक्शन केले आहे. या चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंग, संतोष जुवेकर आणि आशिष पाथोडे हे कलाकार पाहायला मिळाले. थिएटरनंतर प्रेक्षक चित्रपटाचे चाहते त्याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. तुम्ही हा चित्रपट कधी आणि कुठे पाहू शकता ते जाणून घेऊयात.
विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर 'छावा'च्या ओटीटी रिलीजची माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, आले राजे आले. ऐतिहासिक काळातील शौर्य आणि अभिमानाची कहाणी पहा. ११ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर छावा पाहा. अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहते खूप खूश झाले आहेत आणि ते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियासोशल मीडियावरील एका युजरने लिहिले, हर हर महादेव. दुसऱ्याने लिहिले, मी ज्याची वाट पाहत होतो ते हेच. आणखी एका युजरने लिहिले की, आता तुम्ही घरी बसून चित्रपट पाहू शकता. एका युजरने लिहिले की, हा विकीचा सर्वोत्तम चित्रपट आहे.
विकी कौशलचे आगामी चित्रपट'छावा' नंतर विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तो रणबीर कपूर आणि आलिया भटसोबत दिसणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी बनवत आहेत. याशिवाय, विकीकडे 'महावतार' हा चित्रपट देखील आहे, जो अमर कौशिक दिग्दर्शित करत आहे. या अभिनेत्याकडे 'एक जादुगर' हा चित्रपट देखील आहे जो शूजित सरकार दिग्दर्शित करत आहे. तिन्ही चित्रपटांमध्ये विकी वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहे.