Join us

'चिमणी पाखरं'मधील नंदिनी-शेखरची मोठी मुलगी आठवतेय ?,अभिनयापासूनही दूर जात करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 17:15 IST

पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. 

पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर स्टारर 'चिमणी पाखरं' हा सिनेमा २००१ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. 

या कलाकारांसोबत चार बालकलाकारांच्याही भूमिका रसिकांना चांगल्याच भावल्या होत्या. भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांना विशेष भावल्या होत्या. भारती चाटे हिने चित्रपटात नंदिनी आणि शेखरच्या थोरल्या मुलीची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रदर्शित होऊन आता जवळजवळ २१ वर्षांचा काळ लोटला आहे. सिनेमातले हे कलाकार त्यानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर गेले. कोणत्याही नवीन सिनेमा किंवा मालिकेत ते झळकले नाहीत. त्यामुळे सिनेमातले बालकलाकार आता कसे दिसतात ? काय करतात ? याविषयी जाणून घेण्यातही नक्कीच रसिकांना उत्सुकता असेल. 

भारती चाटेनेही अभिनय क्षेत्र सोडला असला तरी कलाक्षेत्रातच ती काम करते. ‘कोठारे व्हिजन’ मध्ये तिने एक वर्ष असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. अभिनयापासून दूर जात भारतीने तिचे संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. लंडनमध्ये इंटरनॅशनल बिजनेसमधून एमबीए केले आहे. मॅनेजिंग प्रॉडक्शन, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग यात तिचा खूप चांगला अनुभव आहे. सिनेमातून भारतीला चांगलीच लोकप्रियता मिळाली असली तरी आता कुठेच तिची चर्चा नसते. लाईमलाइटपासून दूर जात खासगी आयुष्य ती एन्जॉय करत आहे. आशिष नाटेकरसह लग्न करत भारती चाटे संसारात रमली. इतकंच काय तर ती एका मुलीची आई आहे. सायशा असे तिच्या मुलीचे नाव आहे. भारती चाटे ही मच्छिंद्र चाटे यांची मुलगी आहे. मुलीच्या नावावर सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन नावाची निर्मिती संस्था भारतीने सुरु केली होती.रुपेरी पडद्यावर झळकलेल्या भारतीला आता ओळखणेही कठीच आहे. इतका तिच्या लूकमध्ये बदल झाला आहे.  

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरेसचिन खेडेकर