वर्षानुवर्ष नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येतात. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मालिका बंद झाल्या असल्या तरी अगदी मोजक्याच मालिका रसिकांच्या कायम लक्षात राहतात. अशीच एक मालिका म्हणजे छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेली ‘या सुखांनो या’ ही मालिका.
२००५ साली ‘या सुखांनो या’ ही मालिका प्रचंड गाजली होती.ही मालिका रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. मालिकेतल्या कलाकारांना तसंच त्यांच्या भूमिकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेचे कथानक आणि दमदार कलाकरांची फौज मालिकेत होती. ऐश्वर्या नारकर, राजन भिसे, शर्वरी लोहकरे, विक्रम गोखले, संपदा कुलकर्णी या कलाकरांना या मालिकेमुळे नवीन ओळख मिळाली होती. मालिकेतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा कलाकारांच्या आवडत्या झाल्या होत्या. या सगळ्यांमध्ये 'श्रद्धा रानडे' या बालकलाकाराची भूमिकाही भाव खावून गेली होती.
श्रद्धाने 'भाग्यविधाता', 'ममता' ,'या सुखांनो या','खेळ मांडला' अशा मालिकेतून तिला बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी मिळाली. पण ‘या सुखांनो या’ मालिकेतून ती प्रकाशझोतात आली होती.मालिकेतल्या भूमिकेमुळे तिला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली होती. मालिकाच नाही तर जाहीरात क्षेत्रातही तिने काम केले आहे. बड्या ब्रँडच्या जाहीरातींमध्येही ती झळकली होती. अभिनयासोबतच भरतनाट्यमचेही तिने धडे गिरवले आहेत.
आपलं शिक्षण पूर्ण करत असताना ती अभिनयापासून दूर गेली.आता ती अभिनय क्षेत्रापासून दूरच आहे. कोणत्याही नवीन प्रोजेक्टमध्ये श्रद्धा झळकलेली नाही. आता श्रद्धा करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही इतका तच्या लूकमध्ये बदल झाला आहे.
श्रद्धा आता फार सुदंर दिसते. शालेय शिक्षणासाठी श्रद्धा अभिनयापासून दूर गेली. डी जी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्स विषयातून तिने पदवी मिळवली आहे. अभिनय क्षेत्रात चांगल्या संधी मिळाल्या तर पुन्हा काम करणार असल्याचे तिने म्हटले होते.