Join us

'श्वास'मधील बालकलाकाराला आता ओळखणं झालंय कठीण, सिनेइंडस्ट्रीऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:00 IST

२००४ साली रिलीज झालेल्या श्वास या मराठी चित्रपटातील बालकलाकार आहे सध्या सिनेइंडस्ट्रीतून गायब

२००४ साली श्वास हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा आजोबा आणि नातवाच्या नात्याभोवती फिरते. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात आजोबांची भूमिका अरुण नलावडे यांनी साकारली होती तर नातवाची भूमिका अश्विन चितळेने. श्वास चित्रपटातील भूमिकेमुळे अश्विनला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्याने नागेश कुकुनूरच्या आशाऐं या हिंदी चित्रपटात काम केले होते.

बालकलाकार म्हणून अश्विन चितळेने आहिस्ता आहिस्ता , जोर लगाके हैय्या , टॅक्सी नं 9211,देवराई या हिंदी-मराठी सिनेमात काम केले. मात्र त्यानंतर एक बालकलाकार म्हणून नावारूपास आलेला अश्विन मोठेपणी सिनेइंडस्ट्रीत दिसला नाही. जाणून घेऊयात अश्विन सध्या काय करतो. 

अश्विन चितळे आहे मूळचा पुण्याचा. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण घेतले. सर परशुरामभाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून इंडोलॉजि विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्याने अश्विन हेरीटेज टूर्स सुरू केले आहे. ज्याचा तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सीईओदेखील आहे.

अश्विन हेरिटेज टूर्सच्या माध्यमातून तो पर्यटकांसाठी अनेक ठिकाणांच्या टूर्स अरेंज करतो आहे. यातून भारतीय स्थापत्य कलेचे दर्शन पर्यटकांना आकर्षित करताना दिसते. त्याच्या या कार्याला अनेक पर्यटक प्रेमींकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळताना दिसत आहे. 

टॅग्स :अरुण नलावडे