सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये साजरा होणार बालदिन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:14 PM2018-11-12T15:14:05+5:302018-11-12T15:21:00+5:30
अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला मेंटॉर म्हणजेच हर्षद मुलांसोबत छोटा बच्चा समजके हमको हे धम्माल गाण सादर करणार आहे.तसेच कार्यक्रमामध्ये शरयू दाते आणि अजित परब हे देखील हजेरी लावणार आहेत
लहान मुल म्हणजे निरागसता, धम्माल, दंगा... कलर्स मराठीवरीलसूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामधील सगळ्याच लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे... कार्यक्रमामधील हे छोटे सुरवीर विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत आहेत... येत्या १४ नोव्हेंबर रोजी बालदिन असून या कार्यक्रमामध्ये देखील बालदिन विशेष भाग रंगणार आहे. बालदिन विशेष भागामध्ये छोटे सुरवीर बराच दंगा घालणार असून एका पेक्षा एक गाणी देखील सादर करणार आहेत... तसेच मुलांना एक सरप्राईझ देखील मिळणार आहे ... हे सरप्राईझ काय असेल हे प्रेक्षकांना लवकरच कळेल...
अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला मेंटॉर म्हणजेच हर्षद मुलांसोबत छोटा बच्चा समजके हमको हे धम्माल गाण सादर करणार आहे... तसेच कार्यक्रमामध्ये शरयू दाते आणि अजित परब हे देखील हजेरी लावणार आहेत... शरयू दाते आणि अजित परब सुंदर गाण सादर करणार असून जादूगार जितेंद्र रघुवीर हे मंचावर बरेच जादूचे खेळ दाखविणार आहेत ... आता हे जादूचे खेळ काय असणार ? हे कार्यक्रमामध्ये बघणेच रंजक असणा आहे...तर मुद्रा ग्रुप मधील मुलांनी सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमाचा आतापर्यंतचा प्रवास, कार्यक्रमामधील काही गोष्टी ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, ज्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेल्या आहेत त्या नृत्यामधून सादर करणार आहेत.
तसेच या विशेष भागामध्ये सगळेच छोटे सुरवीर अप्रतिम गाणी करणार आहेत... ज्यामध्ये चैतन्य देवडेने मौला मौला, सृष्टी ये मेरा दिल, उत्कर्ष खेळ मांडला तर अंशिकाने ताल मधील गाणे सादर केले... तसेच या बालदिन विशेषमध्ये थँक्यू क्षण देखील मुलांसोबत मनवला जाणार आहे, ज्यामध्ये पालक आपल्या मुलांचे आभार मानणार आहेत...