Join us  

चीनमुळे "दंगल"च ठरला "बाहुबली"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2017 2:11 PM

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल चित्रपटाने जगात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय चित्रपटगृहानंतर परदेशातही दंगलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कमाईत मोठी वाढ झाली आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या दंगल चित्रपटाने जगात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय चित्रपटगृहानंतर परदेशातही दंगलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कमाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात हा चित्रपट चीनमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने चीनमध्ये अक्षरक्ष: कमाईची दंगल केली आहे. लवकरच 1900 कोटीं रुपयांची कमाई दंगलच्या नावे होऊ शकते.  सध्या दंगलने चीनमध्ये १६९ मिलियन डॉलर्सवर म्हणजेत 1088 कोटींची कमाई केली आहे.  या रेकॉर्डब्रेक कमाईसोबत दंगलने हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे.  दंगलची जगभरातील कमाई आता 1870 कोटी रुपये झाली आहे.

दंगलने चिनी बॉक्स ऑफिसवर दिपीकाच्या xXx: Return of Xander Cage तसेच बाबुबली 2 सारख्या चित्रपटांना मागे टाकत भरगच्च कमाई केली आहे.  5 मे 2017 रोजी दंगल शुआई जिआओ बाबा (बाबा, चला कुस्ती खेळू) या नावाने चीनमध्ये प्रदर्शित झाला. सात हजार स्क्रीन्सवर झळकलेल्या या चित्रपटाने चार दिवसांत121 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आमीर खानचा पीके हा चीनमध्ये 100 कोटींची कमाई करणारा पहिला बॉलिवूडपट होता. 

नितेश तिवारी दिग्दर्शित दंगलमध्ये कुस्तीसारख्या पुरूषी खेळात नाव कमावलेल्या फोगाट बहिणींची संघर्ष मांडणारी कथा आहे. आमीर खानने या चित्रपटात कुस्तीपट्टू महावीर फोगट यांची भूमिका केली आहे.