फर्जंद सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या 'फत्तेशिकस्त' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. या सिनेमातील चिन्मय मांडलेकरचा फर्स्टलूक प्रदर्शित झाला आहे. ‘फर्जंद’प्रमाणेच ‘फत्तेशिकस्त’ याही सिनेमातून शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडण्यात येतील. या फोटोवरुन चिन्मय या सिनेमात शिवाजी महाजरांची भूमिका साकारणार आहे.
'फत्तेशिकस्त' हा सिनेमा शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता, भौगोलिक तथा मानसशास्त्रीय उत्तम समज, दूरदृष्टी, कालसुसंगत युद्धनीती यांच्या बळावर महाराजांनी भल्या-भल्या शत्रूंवर मोठ्या चलाखीने चढाया केल्या आणि प्रत्येक मोहिम फत्ते केली. अलीकडेच भारतीय लष्कराने केलेल्या थरारक सर्जिकल स्ट्राईकची पाळंमुळं ही शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्येच रुजलेली आहेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'फत्तेशिकस्त' या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपटाद्वारा आपल्याला अशाच एका अतुलनीय लढ्याचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.
या सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, निखिल राऊत, अनुप सोहोनी, हरिष दुधाढे, अनिकेत मोहन, विक्रम गायकवाड हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. .