दोन स्पेशलच्या या आठवड्यातील भागामध्ये दोन जिवलग मैत्रिणी आणि दोन कवी मनाचे मित्र मंचावर येणार आहेत. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या चिन्मयी सुमित - शुभांगी गोखले आणि गुरु ठाकूर – किशोर कदम यांच्यासोबत बर्याच गप्पा रंगणार आहेत. अनेक मजेदार किस्से, आठवणी, अनुभव प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. जितुसोबत या कार्यक्रमामध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या. दर आठवड्यात मंचावर येणार्या पाहुण्या कलाकारांसोबत जितेंद्र जोशीने मारलेल्या दिलखुलास गप्पा रसिक प्रेक्षकांना आवडत आहेत. एखाद्याला वेगळ्या नावाने ओळख संगितली आहे का ? असा प्रश्न जितूने विचारताच चिन्मयी सुमित यांनी एक मजेदार किस्सा सांगितला. एका व्यक्तिचा घरी कॉल आला होता आणि तिने सुमितबद्दल विचारपुस करण्यास सुरुवात केली, ज्यावर चिन्मयी सुमित यांनी त्या व्यक्तीला उत्तर दिले की, त्याचे लग्न झाले होते पण ती मुलगी काही बारी नाही निघाली आणि हे ऐकताच शुभांगी गोखले आणि जितुला हसू आवरले नाही. यापुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा या गुरुवारचा म्हणजेच ९ जानेवारीचा दोन स्पेशलच भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
जितूने चिन्मयी सुमित - शुभांगी गोखले यांच्यासोबत गप्पा तर मारल्याच पण त्यांच्यासोबत एक गेम देखील खेळण्यात आला. या भागामध्ये मज्जा आणि मस्ती तर भरपूर झाली पण काही भावुक क्षण देखील आले. जेव्हा जितूने चिन्मयी सुमित – शुभांगी गोखले यांना विचारले की, मी ज्या व्यक्तीचे नाव घेईन त्यांनी तुम्हाला काय दिले हे सांगायचे. विनय आपटे आणि हे नाव ऐकताच चिन्मयी यांना अश्रु अनावर झाले त्या म्हणाल्या, “खूप कमी दिल, खूप काही घेऊन गेला. आत्मविश्वास आणि स्वत:कडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली” आणि कथा अरुणाची या दरम्यानचा अनुभव त्यांनी या दरम्यान सांगितला.
याच आठवड्यात कवी मनाचे दोन मित्र म्हणजे गुरु ठाकूर – किशोर कदम देखील मंचावर येणार आहेत. जितूने विचारलेल्या एका प्रश्नावर गुरु ठाकूर भावुक झाले. जितुने विचारले, अस कधी घडल आहे का की, कोणी सांगितले आहे तुमच्या या गाण्याने माझे आयुष्य बदलले यावर काय उत्तर होते हे तुम्हाला शुक्रवारच्या भागामध्ये कळेलच. तर किशोर कदम यांना विचारले भीती कशाची वाटते ? यावर ते म्हणाले, जगण्याची भीती वाटते.” असे ते का म्हणाले असतील याचे उत्तर जाणून घेण्यासाठी बघा शुक्रवारचा भाग. तर गुलजारजी यांचा फोटो दाखवतच किशोर कदम यांचा कंठ दाटून आला.
या दोन मित्रांसोबत एक मजेदार गेम खेळण्यात आला ज्यामध्ये जितूने किशोर कदम यांना विचारले आवडता दिग्दर्शक कोण नागराज मंजुळे की अनुराग कश्यप ? आवडता गीतकार साहिर लुधियानवी की गुलजार ? आवडता कवि संदीप खरे की गुरु ठाकुर ? तर गुरु ठाकूर यांच्यासोबत देखील या खेळ खेळण्यात आला आवडता अभिनेता रितेश देशमुख की अंकुश चौधरी ? हिंदी चित्रपटात जर मुख्य भूमिका करण्याची ऑफर मिळाली तर कोणा बरोबर काम करायला आवडेल प्रियांका चोप्रा की दीपिका पादुकोण ? हे सगळेच प्रश्न आणि दिलेले पर्याय निवडणे अगदीच कठीण होते. शुक्रवारचा म्हणजेच १० जानेवारीचा विशेष भाग गुरु ठाकूर – किशोर कदम यांच्यासोबत रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.