Join us  

चिंटू अंकल लाजवाब! -अभिषेक

By admin | Published: July 06, 2015 2:42 AM

अभिषेक बच्चनने ऋषी कपूरविषयी एक खूपच गमतीशीर बाब सांगितली आहे. दोघेही सोबत कॉमेडी चित्रपट ‘आॅल इज वेल’मध्ये दिसणार आहेत.

अभिषेक बच्चनने ऋषी कपूरविषयी एक खूपच गमतीशीर बाब सांगितली आहे. दोघेही सोबत कॉमेडी चित्रपट ‘आॅल इज वेल’मध्ये दिसणार आहेत. अभिषेक म्हणाला, की कोणीही ऋषी कपूरसारखा डान्स करू शकत नाही. ऋषी कपूरसोबत डान्स करणे म्हणजे त्याचे स्वप्न होते. ‘दिल्ली ६’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने ऋषी कपूर म्हणजेच चिंटू अंकलसोबत डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिषेकने चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांच्यासमोर एक अट ठेवली होती, की त्याला कमीत कमी दोन गाण्यांवर चिंटू अंकलसोबत डान्स करायला मिळाला पाहिजे. ऋषी कपूरसोबत घालवलेले क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.