साऊथ सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi ) यांचा ‘गॉडफादर’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार हवा होती. पण चित्रपट रिलीज झाला आणि ‘गॉडफादर’ बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. सलमान खानचा कॅमिओ असूनही हा सिनेमाची जादू चालली नाही. ‘गॉडफादर’ आधी आलेला चिरंजीवींचा ‘आचार्य’ (Acharya) हा चित्रपटही फ्लॉप झाला. ‘आचार्य’मध्ये चिरंजीवीसोबत त्यांचा मुलगा राम चरण (Ram Charan ) हाही मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. आता याच ‘आचार्य’ चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी आहे.
होय, चिरंजीवी आणि राम चरण या बापलेकांनी ‘आचार्य’ या चित्रपटासंबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘आचार्य’च्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी या बापलेकानं स्वीकारली असून आता मानधनही परत केलं आहे.‘ हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमात याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, ‘एखादा चित्रपट अपयशी ठरत असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे. आचार्य फ्लॉप झाला, ती जबाबदारीही मी स्वीकारली आहे. मी आणि राम चरणने निर्मात्यांना मानधन परत केलं आहे आणि याचं आम्हाला काहीही दु:ख नाही. मी आणि राम चरण आम्ही दोघांनी आमच्या मानधनाचा 80% वाटा निर्मात्याला परत केला आहे.’
‘आचार्य’ हा तेलगू सिनेमा एक अॅक्शन ड्रामा होता. कोरताला सिवा यांनी याचं दिग्दर्शन केलं होतं. यात चिरंजीवी व त्यांचा मुलगा रामचरण दोघेही लीड रोलमध्ये होते. मात्र हे दोन्ही सुपरस्टारही चित्रपटाला यश मिळवून देऊ शकले नाहीत. या चित्रपटावर मेकर्सनी 140 रूपये खर्च केलेत. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 73 कोटी रूपये वसून केले. मात्र इतकी चांगली सुरूवात होऊनही अखेर हा चित्रपट आपटला. पहिल्याच सोमवारी चित्रपट काढायचा निर्णय दक्षिणेतील बºयाच चित्रपटगृहाच्या मालकांनी घेतला होता.