ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी याचा ' कैदी नं 150' हा सिनेमा बुधवारी जगभरात रिलीज होत आहे. या सिनेमाद्वारे चिरंजीवी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करत आहे. या सिनेमासाठी आखाती देशांमधील काही बांधकाम कंपन्या अन्य कार्यालयांनीही सुट्टी जाहीर केली आहे. यावरुन चिरंजीवीचा जलवा केवळ देशातच नव्हे तर देशबाहेरही तितकाच असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा सिनेमा आखाती देशांमधील जवळपास 500 सिनेमागृहांमध्ये तर युएईमध्ये 20 सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा झळकणार आहे. 'चिरंजीवीच्या चाहत्यांनी 11 जानेवारीच्या शोसाठी सर्व तिकिटे आधीचे बुक करुन ठेवली आहेत. शिवाय 10 वर्षांनंतर आमचा हिरो कमबॅक करत आहे. कित्येक वर्षांपासून आम्ही त्याची वाट पाहत आहोत'. असे चिरंजीवी फॅन असोसिएशनचे अध्यक्ष ओरुंगती सुब्रमण्यम यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले.
मस्कतमधील अल रियाद या कन्स्ट्रक्शन आणि ट्रेडिंग एलएलसी कंपनीने चिरंजीवीला तेलुगु सिनेमा क्षेत्रातील 'बादशाहों का बादशाह' असे घोषित केले आहे. शिवाय चिरंजीवी कमबॅक करत असलेल्या 'कैदी नं 150' सिनेमाच्या रिलीज दिवशी सुट्टीदेखील जाहीर केली. 'तेलुगु सिनेमांचा बादशाह चिरंजीवीच्या कमबॅक सिनेमानिमित्ताने कर्मचा-यांना एक दिवसाची सुट्टी देताना आम्हाला खूप आनंद होत आहे', अशी प्रतिक्रिया कंपनीचे मॅनेजर रामदास चंद यांनी दिली आहे.
यापूर्वी ओमानमधील काही सिनेमागृहांमध्ये चिरंजीवीचा मुलगा राम चरन याचा 'ध्रुव' हा सिनेमा दाखवण्यात आल होता, आणि येथे तो जबरजस्त हिटदेखील ठरला होता.