Join us

नवाजुद्दीनसोबतच्या ‘त्या’ सीनमुळे चित्रांगदाला सोडावा लागला होता चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 8:00 AM

नेमके काय होते प्रकरण..

ठळक मुद्देचित्रांगदा ग्लॅमरस आहे. पण   तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

बॉलिवूडची ग्लॅमगर्ल चित्रांगदा सिंग हिचा आज वाढदिवस. चित्रांगदाने कधीच वयाची चाळीशी ओलांडली.   पण या वयातही तिचा बोल्ड आणि हॉट अवतार चाहत्यांना घायाळ करतो. दीर्घकाळापासून चित्रांगदा बॉलिवूडमधून गायब आहे.  30 ऑगस्ट 1976 रोजी जन्मलेल्या ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’ या सिनेमामधून करिअरला सुरुवात केली होती.  

चित्रांगदाचे 2001 साली गोल्फ प्लेअर ज्योती रंधावासोबत लग्न झाले होते. पण 2014 साली हे दोघे वेगळे झाले. चित्रांगदा सिंहला एक मुलगाही आहे पण बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटीफुल दिसणारी चित्रांगदा वयाच्या चाळीशीत असेल असे कोणालाही तिच्याकडे बघून वाटणार नाही. चित्रांगदा अलीकडे एक-दोन सिनेमात झकळली. पण ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ या सिनेमाच्या वेळी चित्रांगदा चांगलीच चर्चेत आली होती. या सिनेमात आधी तिची वर्णी लागली होती. पण अचानक चित्रांगदाने हा सिनेमा सोडला होता. याचे कारण होते, एक सीन.  यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक कुशन नंदी आणि चित्रांगदा सिंह यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगले होते.

  नेमके काय होते प्रकरण..बाबुमोशाय बंदुकबाज या चित्रपटात चित्रांगदाला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत एक इंटीमेट सीन शूट करायचा होता.  नवाजुद्दीन चित्रांगदाला बेडवर जोरात ओढतो आणि त्याला कळते की कोणीतरी त्यांना पाहत आहे. सीनचा फर्स्ट टेक कुशनला आवडला नाही त्यामुळे त्याने दुसरा टेक घेण्यास सांगितले. मात्र यावेळी दिग्दर्शकाने वापरलेली भाषा चित्रांगदाला खटकली होती.  चित्रांगदाने त्याचक्षणी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता. पुढे चित्रांगदाने या सिनेमाच्या दिग्दर्शकावर सेक्शुअल हॅरॅसमेटचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर चित्रांगदा आणि कुशन यांनी एकमेकांवर खूप आरोप प्रत्यारोप केले होते.

आजही आहे ‘हॉट’; पण ‘ब्रेक’ पडला महाग!!

चित्रांगदा ग्लॅमरस आहे. पण   तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. याचे कारण तिने सांगितले होते. ‘मी करिअरला सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात अशी अनेक वळण आली ज्यांनी आयुष्याची प्राथमिकता बदलत गेल्या. मी सिनेमात पाऊल ठेवले आणि त्यानंतर तब्बल चार वर्षांचा ब्रेक घेतला.त्यानंतर मी पुन्हा एकदा सिनेमात आले आणि पुन्हा दोन वर्षांचा ब्रेक घेतला. संधी मिळत असताना मी त्या नाकारल्या. याचे परिणाम मला भोगावे लागले, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 

  

टॅग्स :चित्रांगदा सिंग