Join us

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा बेडरुम Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 18:59 IST

Punit pathak: सध्या सोशल मीडियावर  बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पुनीतचा व्हिडीओ त्याची पत्नी निधी मुनी सिंग हिने शेअर केला आहे

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळेच अनेक सेलिब्रिटीइन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक यांच्या माध्यमातून चाहत्यांटच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये अनेकदा या कलाकारांचे ऑन स्क्रीनबरोबरच काही ऑफ स्क्रीन फोटो, व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. यात साधारणपणे कलाकारांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटना, घडामोडी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर  बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठकचा बेडरुम व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुनीत पाठक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये परिक्षकाची भूमिकाही वठवली आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता काही कमी नाही. त्यातच त्याचा बेडरुम व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये एकाच चर्चेला उधाण आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पुनीतचा व्हिडीओ त्याची पत्नी निधी मुनी सिंग हिने शेअर केला आहे. निधीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ निधीने शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. पुनीत हा बॉलिवूडमधला लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. पुनीत आणि निधीचं लव्हमॅरेज असून एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांची ओळख झाली होती. 

टॅग्स :पुनित पाठकइन्स्टाग्रामसेलिब्रिटी