Join us

लेकीचं आदित्य कपूरसोबत असलेल्या कथित अफेअरबद्दल चंकी पांडेनं केला खुलासा, म्हणाला-ते दोघे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 13:40 IST

अभिनेता चंकी पांडेने दिलेल्या एका मुलाखतीत लेक अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेच्या अफेअरची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. अलिकडेच दोघे युरोपमध्ये एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसले होते. त्यांच्या व्हॅकेशनच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं खूप वेधून घेतलं  होते. युरोपवरुन परतल्यानंतरही  आदित्य आणि अनन्या डिनर डेटवरही स्पॉट झाले होते. मात्र अद्याप दोघांनी त्यांचं रिलेशनशीप कन्फर्म केलेलं नाही.  याच दरम्यान चंकी पांडेची लेकीच्या रिलेशनशीपवर प्रतिक्रिया आली आहे. 

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना खात्री आहे की दोघेही  रिलेशनशिपमध्ये आहेत. पण अनन्याचे वडील आणि अभिनेता चंकी पांडे हे या नात्याबाबत खुश नाहीत. अनन्या आणि आदित्यच्या डेटिंगच्या अफवांबद्दल विचारले असता, चंकी पांडे म्हणाला, ते दोघे कोणत्याही प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये नाहीत.

 पुढे म्हणाला, अशा प्रकारच्या अफवांना तुम्ही थांबवू शकत  नाही. नंतर, ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्ही आपल्या मुलीसोबत कोण चांगले वाटले असे विचारले असता, चंकी पांडे यांनी आदित्यचे नाव घेणं टाळलं.  पत्‍नी पत्‍नी और वोमध्‍ये कार्तिक आर्यनसोबतही अनन्या चांगली दिसत होती, असे अभिनेता म्हणाला. यासोबतच अनन्याचे कौतुक करताना चंकीने सांगितले की, तिचा आतापर्यंतचा प्रवास खूप छान आहे.

अनन्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती या महिन्यात रिलीज होणाऱ्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटात दिसणार आहे. २५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अनन्या पहिल्यांदाच आयुष्मान खुरानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आदित्य रॉय कपूर अनुराग बसूच्या 'मेट्रो इन दिनन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती सारा अली खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

 

टॅग्स :चंकी पांडेअनन्या पांडेआदित्य रॉय कपूर