CID या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे दिनेश फडणीस. या मालिकेतील फ्रेडरिक या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. गेल्या काही दिवसांपासून दिनेश फडणीस यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. पण, आता CID फेम दयाने दिनेश यांना हृदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगत त्यांच्या प्रकृतीबाबत दयांनद शेट्टी यांनी मोठी अपडेट दिली आहे.
"दिनेश फडणीस रुग्णालयात उपचार घेत असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. परंतु, त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही. अन्य कारणाने ते रुग्णालयात आहेत. मला सध्या याबाबतीत काहीच बोलायचं नाही," असं दयानंद शेट्टीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, दिनेश फडणीस यांच्यावर तुंगा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. CID मधील कलाकारही त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेल्याची माहिती आहे.
57 वर्षीय दिनेश यांनी CID मध्ये फ्रेडिरिक्स ही भूमिका साकारली आहे. थोडीशी विनोदी झटा असलेली ही भूमिका त्यांनी अत्यंत सुंदररित्या साकारली होती.१९९८ ते २०१८ पर्यंत त्यांनी ही भूमिका केली. त्यानंतर ते तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत कॅमियो रोलमध्येही झळकले होते.