Join us

मुन्नाभाईमध्ये सर्किटने केले होते नर्सशी लग्न, नेटिझन्सने अनेक वर्षांनी लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 18:48 IST

सर्किटने मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये कोणासोबत लग्न केले हे चित्रपटात दाखवण्यात आले नव्हते. पण त्याचे कोणासोबत लग्न झाले हे आता नेटिझन्सने शोधून काढले आहे.

ठळक मुद्देशेवटच्या शॉर्टमध्ये आपल्याला सर्किट, त्याची पत्नी आणि मुलगा दिसला होता. 

मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील मुन्ना आणि सर्किटची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटात संजय दत्त आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शेवटी मुन्नाचे डॉ. समुनसोबत लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच शेवटच्या शॉर्टमध्ये आपल्याला सर्किट, त्याची पत्नी आणि मुलगा दिसला होता. 

सर्किटने मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये कोणासोबत लग्न केले हे चित्रपटात दाखवण्यात आले नव्हते. पण त्याचे कोणासोबत लग्न झाले हे आता नेटिझन्सने शोधून काढले आहे. सर्किटने मुन्नाभाई शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमधील एका नर्सशी लग्न केल्याचा नेटकऱ्यांनी शोध काढला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्किटचा नर्स आणि मुलासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्या नर्सचा फोटो देखील आहे. या फोटोवर ‘मुन्नाभाई चित्रपटातील सर्किटने नर्सशी लग्न केले हे कळायला तुम्हाला किती वर्षं लागली?’ असा प्रश्न विचारण्यात आला आहे. 

या पोस्टवर नेटिझन्स भन्नाट कमेंट करत आहेत. भाईने डॉक्टरशी लग्न केले तर सर्किटने नर्सशी लग्न करायला नको का, असे म्हणत नेटिझन्स खिल्ली उडवत आहेत. 

टॅग्स :अर्शद वारसीसंजय दत्त