राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर परखडपणे बोलणा-या अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एका मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर स्वराने मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. सोमवारी रात्री लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाले आणि स्वराने ट्वीट करत, मोदी सरकारवर प्रहार केला.‘(भारतात) धर्म हा नागरिकत्वाचा आधार नाही. धर्माच्या आधारावर भेदभाव होऊ शकत नाही. राज्य धर्माच्या आधारावर निर्णय घेऊ शकत नाही. नागरिकता सुधारणा विधेयकाने मुस्लिमांना बाहेर ठेवले आहे. NRC/CAB यामधून जिन्नांचा पुनर्जन्म झाला आहे. हॅलो हिंदू पाकिस्तान’, असे ट्वीट तिने केले.
स्वरा ही भाजपा विरोधक मानली जाते. स्वराने या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय, भोपाळ, दिल्ली, राजस्थान अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार केला होता. यानंतर निकालाच्या दिवशी भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू होताच, अनेकांनी स्वराला ट्रोल करणे सुुरू केले होते. सोशल मीडियावर स्वराची खिल्ली उडवणा-या अनेक ट्वीटचा पूर आला होता.
कोई, स्वरा भास्कर का हाल बताओ? असे एका युजरने लिहिले होते. तर अन्य एका युजरने ‘अनारकली ऊर्फ स्वरा भास्कर उठो, ईव्हीएम पे रोने का वक्त आ गया है,’असे लिहिले होते. अनेक युजर्सनी स्वराला डिवचत,कहा हो, असा प्रश्न केला आहे. क्या स्वरा भास्कर ये सब झेल पायेगी, असे ट्वीट एका युजरने केले होते.