Join us  

सखीचा अंकुशसोबतचा क्लिक

By admin | Published: March 21, 2016 1:52 AM

मराठी इंडस्ट्रीचा अ‍ॅक्शन हीरो अंकुश चौधरी याने मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने क्रेझी केले आहे. यासाठी त्याचा फॅन्स-फॉलोइंगदेखील फार मोठा आहे

मराठी इंडस्ट्रीचा अ‍ॅक्शन हीरो अंकुश चौधरी याने मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने क्रेझी केले आहे. यासाठी त्याचा फॅन्स-फॉलोइंगदेखील फार मोठा आहे. तसेच, त्याच्या या चाहत्यांमध्ये मराठी सेलीब्रिटीदेखील मागे नाहीत. अलीकडेच ‘दिल-दोस्ती-दुनियादारी’ मालिकेतून तरुणाईच्या दिलाची धडकन बनलेली सखी गोखले व आपल्या हुशारीने तरुणाईला चक्रावून ठेवणारा सुव्रत जोशी या दोन कलाकारांनी आपल्या आयकॉन असलेल्या अंकुश चौधरीसोबतचा एक क्लिक सोशल मीडियावर अपडेट केला आहे.