Join us

विजया‘बाई’ घेणार रंगकर्मींची ‘शाळा’

By admin | Published: April 13, 2016 2:52 AM

मराठी रंगभूमीवर ‘बाई’ या आदरार्थी संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता आता थेट ज्येष्ठांसह, नव्या कलावंतांची कार्यशाळा घेणार आहेत. खुद्द बार्इंनीच ही माहिती

- राज चिंचणकर,  मुंबई

मराठी रंगभूमीवर ‘बाई’ या आदरार्थी संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता आता थेट ज्येष्ठांसह, नव्या कलावंतांची कार्यशाळा घेणार आहेत. खुद्द बार्इंनीच ही माहिती दिली आणि ‘मी कार्यशाळा घेत असले तरी मी शिक्षिका नाही, तर आजही विद्यार्थिनीच आहे,’ असे सांगत त्यांची याविषयीची भूमिकाही अधोरेखित केली.रंगभूमीवर ‘बार्इं’च्या हाताखालून गेलेले अनेक कलावंत आज नावारूपाला आले आहेत आणि ‘बार्इं’च्या ‘स्कूल’चे उपकार ते आजही मानतात. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, भारती आचरेकर, प्रतिमा कुलकर्णी अशा सीनिअर कलाकारांपासून आजच्या पिढीतल्या अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी यांच्यापर्यंत अनेक कलावंतांनी ‘बार्इं’च्या ‘स्कूल’चे धडे गिरवले आहेत. साहजिकच, या सर्व मंडळींच्या ‘बाई’ कार्यशाळा घेणार ही उत्सुकता वाढवणारीच गोष्ट आहे. नाट्यक्षेत्रात करिअरच्या मध्यावर आलेले कलावंत आणि दिग्दर्शकांना नवे धडे देण्यास ‘बाई’ आता पुन्हा सरसावल्या आहेत.या कार्यशाळेचा उद्देश सांगताना ‘बाई’ म्हणतात, रंगभूमीवरची परिस्थिती काळाच्या ओघात आता बदलली आहे. सध्या जी मुले रंगभूमीवर काम करत आहेत, ती माझ्या नातवंडांच्या वयाची आहेत. कलेविषयी माझ्या ज्या काही श्रद्धा आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे वाटते. ‘मॅजिक मोमेंट्स’ या शीर्षकाखाली २ ते ६ मे या कालावधीत रवींद्र नाट्यमंदिरात भरणाऱ्या ‘बार्इं’च्या या शाळेचे आयोजन ‘पंचम् निषाद’ या संस्थेने केले आहे.रिफ्रेश होण्यासाठी कार्यशाळापूर्वी अभिनय हे क्षेत्र आॅप्शनला असायचे, पण आता ते करिअर झाले आहे. नटाला अनेक वर्षे काम केल्यावर एक प्रकारची मरगळ येते. त्याच्या कामात तोचतोचपणा येतो. अशावेळी रिफ्रेश होण्यात अशी कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावते. आमच्या ‘बार्इं’ची कार्यशाळा ही जबाबदारी नक्की पार पाडेल.- नीना कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्रीही तर आमच्यासाठी पर्वणी‘बार्इं’नी माझ्याभोवती अनोखे विश्व निर्माण केले आहे. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या दरम्यान त्यांनी मला माझा ‘आवाज’ मिळवून दिला आणि माझ्या आवाजातले ‘वजन’ ओळखायला शिकवले. कार्यशाळा मनातली अनेक कुलुपे उघडत जाते आणि ‘बार्इं’ची कार्यशाळा म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच आहे.- अमृता सुभाष, युवा अभिनेत्री