Join us

'सुंदरा मनामध्ये भरली'मधून आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या अभिनेत्रीचं नव्या प्रोजेक्टमध्ये कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 11:41 AM

सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhe Bharli)मध्ये निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मालिका सोडली होती.

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhe Bharli)मध्ये निगेटिव्ह भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे मालिका सोडली होती. मात्र आता ही अभिनेत्री कमबॅक करत असल्याचे समजते आहे. या अभिनेत्रीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाल्याचे समजते आहे. आता ही अभिनेत्री कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल ना..तर ही अभिनेत्री म्हणजे प्रमिती नरके (Pramiti Narke).

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा जहांगीरदारचे पात्र अभिनेत्री प्रमिती नरकेने साकारले होते. हे पात्र जरी निगेटिव्ह असले तरी या भूमिकेतून तिला खरी ओळख मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी प्रमिती नरकेने तिच्या आजारपणाचे कारण देत मालिकेतून निरोप घेतला होता. प्रमिती नरकेच्या चेहऱ्यावर मेकअप केल्यामुळे इन्फेक्शन दिसून आले होते. याच कारणामुळे तिने मालिका सोडली होती. ही मालिका सोडताना तिला खूप दुःख झाले होते. पण तरीही स्वतःच्या आरोग्यासाठी तिला ही मालिका सोडणे गरजेचे असल्याचे तिने सोशल मीडियावर सांगितले होते.

प्रमिती नरकेला आता कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. तिला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. आता ती मालिकेतून नाही तर एका नाटकातून परत आपल्या भेटीला येत आहे. कातळ डोह या नाटकातून ती आपल्या भेटीला येत आहे. या नाटकाचे लेखन धनजंय सरदेशपांडे यांनी केले आहे. तर दिग्दर्शन सुयश झुंजूरके यांनी केले आहे. तिच्या या नवीन नाटकाचे पोस्टर देखील तिने तिच्या इन्स्टाग्रामला शेअर केले आहे. प्रमिती मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करत आहे, त्यामुळे चाहतेदेखील खूप उत्सुक आहेत.

प्रमिती नरकेने मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. याशिवाय तिने तू माझा सांगाती या मालिकेत तुकाराम महाराज यांची पत्नी आवलीची भूमिका केली होती. तसेच गर्जा महाराष्ट्र माझा या शोमध्ये देखील प्रमिती दिसली होती. मात्र तिला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून खरी ओळख मिळाली. 

टॅग्स :कलर्स मराठी